-
बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वाचा प्रवास नुकताच दिमाखात संपन्न झाला असून या पर्वाची सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे.
-
या सीझनमध्ये सुरुवातीला १७ स्पर्धक घरामध्ये सहभागी झाले होते आणि त्यानंतर चार वाईल्ड कार्ड स्पर्धकांनी घरात दिमाखदार एन्ट्री घेतली होती.
-
राकेश बापट, तन्वी कोलते, अनुश्री माने, विशाल कोटियन व दीपाली सय्यद या पाच स्पर्धकांनी आपल्या खेळाच्या जोरावर टॉप ५ मध्ये स्थान मिळवले.
-
या चुरशीच्या स्पर्धेत अनुश्री माने हिचा प्रवास संपला असून ती चौथ्या क्रमांकावर बिग बॉसच्या घरातून बाहेर पडली आहे.
-
घरातून बाहेर पडल्यानंतर अनुश्रीने रितेश देशमुखसोबतचा एक सुंदर फोटो शेअर करत चाहत्यांसाठी आणि रितेश सरांसाठी खास पोस्ट लिहिली आहे.
-
अनुश्रीने कॅप्शनमध्ये लिहिले की, “रितेश सर, तुम्ही खऱ्या अर्थाने ‘लय भारी’ आहात..! बिग बॉस मराठीचा हा प्रवास माझ्यासाठी खरंच अविस्मरणीय होता, ह्या १०० दिवसांत अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या; त्यात झालेली प्रत्येक चूक सुधारण्यासाठी ‘भाऊच्या धक्क्यावर’ तुम्ही करत असलेले मार्गदर्शन आणि चांगल्या गेमबद्दल करत असलेलं कौतुक नेहमीच प्रेरणादायी ठरलं आणि विशेष म्हणजे तुमचा, अखंड हिंदुस्थानाचे आराध्यदैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा जाज्वल्य इतिहास दाखवणारा ऐतिहासिक ‘राजा शिवाजी’ या स्वप्नवत प्रकल्पासाठी तुम्हाला आणि सर्व टीमला खूप खूप शुभेच्छा! हा सिनेमा नक्कीच इतिहास रचणार..! जय जिजाऊ | जय शिवराय.”
-
अनुश्रीने या पोस्टच्या माध्यमातून रितेश देशमुख यांच्याबद्दलचा आदर व्यक्त करत त्यांच्या आगामी ऐतिहासिक सिनेमाला मनापासून शुभेच्छा दिल्या आहेत.
-
अनुश्रीने शेअर केलेला हा फोटो आणि तिची ही भावूक पोस्ट सध्या सोशल मीडियावरील विविध प्लॅटफॉर्मवर तुफान व्हायरल होत आहे.
-
(सर्व फोटो साभार-अनुश्री माने इन्स्टाग्राम)
इन्स्टाग्रामचा 80s फोटो ट्रेंड तुम्हाला फॉलो करायचाय? वापरा ChatGPT चे ‘हे’ सोपे Prompts