-
‘झी मराठी’वरील लोकप्रिय मालिका ‘कारभारी लय भारी’मधील मुख्य जोडी अनुष्का सरकटे आणि निखिल चव्हाण यांचा नुकताच साखरपुडा झाला आहे.
-
मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वांत लोकप्रिय जोडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उमेश आणि प्रियाची ओळखही अभिनयादरम्यान झाली आणि पुढे त्यांनी लग्नगाठ बांधली.
-
‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेच्या सेटवर राणादा आणि पाठकबाई अर्थात हार्दिक आणि अक्षया यांची ओळख झाली, ज्याचे रूपांतर नंतर लग्नात झाले.
-
‘तू अशी जवळी रहा’मालिकेत एकत्र काम करताना तितीक्षा आणि सिद्धार्थ यांची मैत्री झाली आणि आता ते खऱ्या आयुष्यातही जोडीदार आहेत.
-
देवमाणूस २’ या अत्यंत गाजलेल्या मालिकेत किरण गायकवाड आणि अभिनेत्री वैष्णवी कल्याणकर यांनी एकत्र काम केले असून, ही जोडीही चर्चेत राहिली आहे.
-
शिवानी आणि अजिंक्य यांची पहिली भेट ‘तू जीवाला गुंतवावे’ मालिकेच्या सेटवर झाली; मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
-
लग्नाची वाईफ वेडिंगची बायकू या मालिकेच्या सेटवर विजय आणि रूपाली यांची ओळख झाली आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडले.
-
‘विठू माऊली’ मालिकेच्या सेटवर साक्षी आणि अथर्वची भेट झाली. सात वर्षांच्या प्रदीर्घ रिलेशनशिपनंतर हे दोघे नुकतेच लग्नबंधनात अडकले आहेत.
-
कलेच्या प्रांतात एकत्र काम करताना निर्माण झालेली ही नाती प्रेक्षकांसाठी नेहमीच कौतुकाचा विषय ठरतात. (सर्व फोटो साभार- इन्स्टाग्राम)
‘झुंजुर-मुंजुर पाऊस माऱ्यानं’, गाण्यावर तरूणींनी धरला ठेका; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “अंगभर पेहराव करून…”