-
ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक त्याच्या ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो ज्याचा शुभ-अशुभ प्रभाव मानवी जीवनावर पाहायला मिळतो. ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र एकमेव असा ग्रह आहे जो सर्वात वेगवान गतीने एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. तो एका राशीमध्ये जवळपास अडीच दिवस राहतो.
-
पंचांगानुसार, चंद्र २३ एप्रिल २०२६ रोजी दुपारी ०१ वाजून १२ मिनिटांनी मिथुन राशीतून कर्क राशीत प्रवेश करेल. चंद्राचे हे गोचर १२ पैकी काही राशींच्या व्यक्तींसाठी खूपच भाग्यकारी ठरेल.
-
चंद्राचा कर्क राशीतील प्रवेश कर्क राशीसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील.
-
कन्या राशीत चंद्राचा प्रवेश होणार आहे, त्यामुळे हे राशी परिवर्तन कन्या राशीसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल.
-
वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी चंद्राचा कर्क राशीतील प्रवेश खूप लाभदायी सिद्ध होईल. हा काळ तुमच्यासाठी सकारात्मक सिद्ध होईल. आत्मविश्वासात वाढ होईल. आनंदी वार्ता कानी पडतील. समाजात मानसन्मान वाढेल.
-
मकर राशीच्या व्यक्तींसाठी चंद्राचे हे गोचर खूपच खास ठरेल. या काळात तुमचे संपूर्ण आयुष्य बदलेल आकस्मिक धनलाभ होतील. प्रत्येक कामात कुटुंबीयांची साथ मिळेल.
-
मीन राशीच्या लोकांना प्रत्येक कामात कुटुंबीयांची साथ मिळेल. तुमच्या सर्व अडचणी दूर होतील. दूरचे प्रवासही घडतील.या काळात आरोग्य उत्तम राहील. धार्मिक यात्रा कराल. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील.
-
(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
-
(फोटो सौजन्य: AI)
नाना पाटेकर यांच्याबद्दल विचारल्यानंतर राखी सावंतने एका शब्दात दिलं उत्तर, तर आमिर खानला विचारला ‘हा’ प्रश्न; म्हणाली…