-
धार्मिक विधी आणि मंत्रांच्या पवित्र स्वरात काल २२ एप्रिल रोजी पहाटे केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले असून भाविकांना आता दर्शन घेता येणार आहे. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
-
केदारनाथची वाट चढणीची असल्याने प्रवासापूर्वी चालण्याचा आणि व्यायामाचा सराव करून स्वतःला तंदुरुस्त ठेवावे. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
-
साहित्याचे नियोजन
प्रवासादरम्यान केवळ आवश्यक वस्तूच सोबत ठेवाव्यात, जेणे करून थकवा किंवा श्वास घेण्यास त्रास होणार नाही. (फोटो सौजन्य : फ्रीपिक) -
हवामानाचा अंदाज
डोंगरावरील वातावरण सतत बदलत असल्याने पावसापासून आणि थंडीपासून वाचण्यासाठी नेहमी उबदार तसेच जलरोधक कपडे जवळ ठेवावेत. (फोटो सौजन्य : फ्रीपिक) -
पेहरावाचे भान
हिमालयातील कडाक्याची थंडी लक्षात घेता केवळ सुती कपड्यांवर अवलंबून न राहता लोकरीचे कपडे परिधान करणे हिताचे ठरते. (फोटो सौजन्य : फ्रीपिक) -
खाद्यपदार्थ आणि ऊर्जा
शरीरातील ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी सुका मेवा आणि प्रथिनेयुक्त हलका आहार घेऊन संथ गतीने चालत राहावे. (फोटो सौजन्य : फ्रीपिक) -
पवित्रतेचे रक्षण
हे एक अत्यंत पावन तीर्थक्षेत्र असल्याने तेथे शांतता राखावी आणि कचराकुंडीचा वापर करून परिसराची स्वच्छता जपावी. (फोटो सौजन्य : फ्रीपिक) -
प्रवासापूर्वी नोंदणी पूर्ण करून हवामान आणि मार्गाची माहिती घ्यावी, जेणेकरून दर्शन घेताना कोणताही अडथळा येणार नाही. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
-
(टीप : येथे देण्यात आलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक महितीकरिता तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.) (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
नाना पाटेकर यांच्याबद्दल विचारल्यानंतर राखी सावंतने एका शब्दात दिलं उत्तर, तर आमिर खानला विचारला ‘हा’ प्रश्न; म्हणाली…