-
दाक्षिणात्य आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री मेहरीन पीरजादा सध्या तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे.
-
मेहरीनने पीरजादाने अर्श औलख यांच्याशी हिमाचल प्रदेशमधील चैल या निसर्गरम्य ठिकाणी अत्यंत खासगी सोहळ्यात लग्नगाठ बांधली.
-
मेहरीन आता ३० वर्षांची असून, तिच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
-
लग्नात मेहरीन खूपच सुंदर दिसत होती.
-
मेहरीन पीरजादा दोन वर्षांपूर्वी म्हणजेच वयाच्या २८ व्या वर्षी तिचे ‘एग्ज फ्रीज’ (Eggs Freeze) करण्याच्या निर्णयामुळे चर्चेत आली होती.
-
भविष्यात मातृत्वाचा आनंद घेता यावा आणि करिअरवरही लक्ष केंद्रित करता यावे, या उद्देशाने तिने हे पाऊल उचलले होते.
-
मेहरीनने ‘फिल्लौरी’ सारख्या हिंदी चित्रपटातून आणि अनेक गाजलेल्या दाक्षिणात्य चित्रपटांतून आपली ओळख निर्माण केली आहे.
-
मेहरीन पीरजादाचा पती अर्श औलखबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही.
-
मेहरीनने लग्नाचे फोटो पोस्ट केल्यावर या नवीन प्रवासासाठी तिच्यावर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
-
(सर्व फोटो – मेहरीन पीरजादा इन्स्टाग्राम)
रात्री झोपण्यापूर्वी हळदीचे दूध प्यायल्यास शरीरास कोणते फायदे मिळतात? वाचा डॉक्टरांचा सल्ला