-
फॅशन स्टायलिस्ट करिश्मा गुलाटीने अभिनेत्री जिनिलीया देशमुखचे काही अप्रतिम फोटो सोशल मीडियावर शेअर केले असून, तिच्या या पारंपरिक लूकची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे.
-
जिनिलीया देशमुखने या फोटोशूटसाठी खास कॉटन पैठणी परिधान केली असून, ही साडी हातमाग कलेचा एक उत्कृष्ट नमुना आहे.
-
या साडीसोबत तिने अंगावर गोल्ड टिश्यू पैठणी दुपट्टा ओढला आहे, जो तिच्या या पारंपरिक लूकला एक राजेशाही थाट देतोय.
-
तिने हातामध्ये हिरवा चुडा घातला आहे, जो महाराष्ट्रीयन संस्कृतीत सौभाग्य आणि मांगल्याचे प्रतीक मानला जातो.
-
गळ्यात घातलेली मोत्याची ठुशी तिच्या सौंदर्यात भर घालत असून, हा दागिना अतिशय आत्मविश्वासपूर्ण आणि उठावदार दिसत आहे.
-
केसात माळलेला मोगऱ्याचा गजरा केवळ फूल नसून ती एक भावना असल्याचे जिनिलीयाने आपल्या लूकमधून अधोरेखित केले आहे.
-
या संपूर्ण लूकचे मुख्य आकर्षण म्हणजे तिची प्राजक्ताच्या फुलापासून प्रेरित असलेली कस्टम नथ, जी अतिशय प्रतिकात्मक वाटते.
-
ही नथ तिची आगामी भूमिका ‘राजा शिवाजी’ चित्रपटातील ‘सईबाई’ यांच्या व्यक्तिरेखेवरून प्रेरित होऊन तयार करण्यात आली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: जिनिलीया देशमुख/इन्स्टाग्राम)
Robert Kiyosaki: “आता पैशाच्या इतिहासातील सर्वात कठीण काळ सुरू होतोय!”; ‘रिच डॅड पुअर डॅड’च्या रॉबर्ट कियोसाकींचे भाकीत