-
आयुष्यात एकदा तरी केदारनाथ धाम मंदिरात दर्शनासाठी जायचं असं अनेकांचं स्वप्न असतं. लोकप्रिय मराठी अभिनेत्रीचं हेच स्वप्न नुकतंच पूर्ण झालं आहे.
-
मराठी मालिकाविश्वातून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री विदिशा म्हसकर केदारनाथ यात्रेला गेली आहे. उत्तराखंड येथील ‘केदारनाथ धाम’ हे भगवान शिवशंकराच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. त्यामुळे दरवर्षी मंदिराचे दरवाजे उघडल्यावर याठिकाणी लाखो भाविक दर्शनासाठी जातात.
-
केदारनाथ मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी भाविकांना गौरीकुंड येथून पायी प्रवास करावा लागतो. हा संपूर्ण ट्रेक पूर्ण करण्यासाठी विदिशाला १२ तास लागले. ही यात्रा फारच कठीण आहे, त्यामुळे असंख्य भाविक केदारनाथ यात्रेसाठी घोड्यावरून जातात किंवा हेलिकॉप्टरने प्रवास करण्याचा मार्ग निवडतात. पण, विदिशाने ही यात्रा पायी पूर्ण केल्याचं पाहायला मिळत आहे.
-
विदिशाने पहाटे ४ वाजता ट्रेकला सुरुवात केली होती. पुढे सकाळी नऊपर्यंत तिने फक्त ४ किलोमीटरचा ट्रेक पूर्ण केला होता.
-
पहाटे चार वाजल्यापासून ते दुपारी बरोबर अडीच वाजेपर्यंत विदिशा मंदिरापासून फक्त २ किलोमीटर अंतरावर होती. ही संपूर्ण यात्रा पूर्ण करण्यासाठी तिला जवळपास १२ तास लागले. हा एवढा प्रवास केल्यावर जेव्हा मंदिर दिसतं, तेव्हा सगळा थकवा दूर होतो….. अजून काय हवं? असं विदिशा सांगते.
-
केदारनाथ धाम पाहताच अभिनेत्री भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. विदिशाने याठिकाणी दर्शन घेऊन पहाटे अभिषेक सुद्धा केला. ‘Magical Experience’ असं कॅप्शन विदिशाने या फोटोला दिलं आहे.
-
याशिवाय विदिशाने मंदिराच्या बरोबर मागे असलेल्या भीमशिलेचं दर्शनही घेतलं. २०१३ मध्ये केदारनाथमध्ये ढगफुटी होऊन महापूर आला होता, यावेळी या शिळेमुळे पुराचं पाणी विभागलं गेलं आणि मंदिर सुरक्षित राहिलं असं स्थानिकांकडून सांगितलं जातं.
-
यंदा २२ एप्रिल २०२६ रोजी केदारनाथ धाम मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले. बर्फवृष्टीमुळे हे मंदिर दिवाळीनंतर सहा महिने बंद असतं. त्यामुळे मंदिराचे दरवाजे उघडल्यावर दरवर्षी भाविक मोठ्या संख्येने केदारनाथला जातात.
-
अशाप्रकारे विदिशाने या केदारनाथ यात्रेचे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ( सर्व फोटो सौजन्य : विदिशा म्हसकर इन्स्टाग्राम )
अस्वस्थ तरुण संसदेच्या दारात! हजारोंच्या संख्येपुढे सुरक्षादले हतबल; अश्रुधुराचा माराही निष्प्रभ