-
सोनी मराठीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra) हा कार्यक्रम सध्या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.
-
उत्कृष्ट संहिता, कलाकारांचे भन्नाट सादरीकरण आणि अचूक कॉमेडी टाइमिंगमुळे या कार्यक्रमाने प्रत्येक घरात आपली जागा निर्माण केली आहे.
-
या शोमधील लोकप्रिय अभिनेत्री नम्रता संभेराव (Namrata Sambherao) आपल्या विनोदी शैलीने प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करत असते.
-
नुकतेच नम्रताने एका खास फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये नम्रताने पिवळ्या रंगाची प्लेन कॉटन साडी नेसली असून, त्यावर निळ्या रंगाचा नथ एम्ब्रॉयडरी असलेला खणाचा ब्लाऊज परिधान केला आहे.
-
या सावळ्या सौंदर्याला साजेसे दागिने, हातात बांगड्या आणि गळ्यात मंगळसूत्र असा नम्रताचा हा लूक अत्यंत मोहक दिसत आहे.
-
नम्रताच्या या फोटोंवर तिच्या सहकलाकारांसह चाहत्यांनीही पसंतीची पावती दिली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : नम्रता संभेराव/इन्स्टाग्राम)
अस्वस्थ तरुण संसदेच्या दारात! हजारोंच्या संख्येपुढे सुरक्षादले हतबल; अश्रुधुराचा माराही निष्प्रभ