-
Bigg Boss Marathi Season 6: कलर्स मराठीवरील लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’ मराठीच्या सहाव्या पर्वाचा महाअंतिम सोहळा नुकताच १९ एप्रिल रोजी दिमाखात पार पडला.
-
या पर्वात आपल्या बेधडक अंदाजाने प्रेक्षकांची मने जिंकणारी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अनुश्री माने (Anushri Mane) सध्या तिच्या एका नवीन फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.
-
अनुश्रीने बिग बॉसच्या घरात एक प्रबळ आणि धाडसी स्पर्धक म्हणून ओळख निर्माण केली होती.
-
आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे आणि कोणाशीही न डगमगता भिडण्याच्या वृत्तीमुळे ती संपूर्ण सीझनमध्ये चर्चेचा केंद्रबिंदू ठरली.
-
या अटीतटीच्या स्पर्धेत अनुश्रीने चौथ्या क्रमांकापर्यंत मजल मारली.
-
या फोटोशूटसाठी अनुश्रीने केशरी रंगाचा बांधणी ड्रेस परिधान केला असून, तिचा हा लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.
-
बिग बॉसमध्ये सहभागी होण्यापूर्वीच अनुश्रीची सोशल मीडियावर मोठी फॅन फॉलोइंग होती, मात्र या शोमुळे तिच्या लोकप्रियतेत आता प्रचंड वाढ झाली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : अनुश्री माने/इन्स्टाग्राम)
चपातीला तूप लावून खाल्ल्यानं कोणते आजार बरे होतात? त्याचे फायदे जाणून घ्या