-
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय आणि ग्लॅमरस अभिनेत्री पूजा सावंत आपल्या सौंदर्याने नेहमीच चाहत्यांना घायाळ करत असते.
-
तिने सोशल मीडियावर तिचे काही नवीन फोटो शेअर केले असून या फोटोंनी सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे.
-
पूजाचा हा ताजा लूक पारंपरिक आणि आधुनिकतेचा एक सुंदर संगम असल्याचं पाहायला मिळतंय.
-
तिने या खास फोटोशूटसाठी अत्यंत सुंदर असा लाल रंगाचा घागरा परिधान केला आहे.
-
या घागऱ्यावर निळ्या आणि चंदेरी रंगाची ओढणी असून त्यावर मोर आणि आकर्षक नक्षीकाम केलेले आहे.
-
काठावर असलेली बारीक लेस आणि भरजरी वर्क तिच्या या लूकला अधिक उठावदार बनवत आहे.
-
दागिन्यांच्या बाबतीत बोलायचे झाले तर तिने गळ्यात चिंचपेटी स्टाईलचा चोकर आणि कानात मोठे झुमके घातले आहेत.
-
मोकळे सोडलेले केस आणि तिची दिलखेच अदा पाहून चाहते पुन्हा एकदा तिच्या प्रेमात पडले आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य: पूजा सावंत/इन्स्टाग्राम)
Robert Kiyosaki: “आता पैशाच्या इतिहासातील सर्वात कठीण काळ सुरू होतोय!”; ‘रिच डॅड पुअर डॅड’च्या रॉबर्ट कियोसाकींचे भाकीत