-
भारतीय घरांमध्ये पनीरला विशेष पसंती दिली जाते, मात्र अलीकडे बाजारात भेसळयुक्त पनीरची विक्री वाढल्याने ग्राहकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
-
नफा कमावण्यासाठी पनीरमध्ये स्टार्च, कृत्रिम दूध आणि डिटर्जंट यांसारखे घातक पदार्थ मिसळले जातात, ज्यामुळे पोटाचे विकार आणि विषबाधा होऊ शकते. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
-
पोत चाचणी
शुद्ध पनीर मऊ आणि हाताने दाबल्यावर सहज विखुरणारे असते, मात्र भेसळयुक्त पनीर रबरासारखे ताणले जाणारे किंवा लवचिक असते. (फोटो सौजन्य : फ्रीपिक) -
गरम पाण्याचा प्रयोग
पनीरचा तुकडा कोमट पाण्यात टाकल्यावर जर तो विरघळू लागला किंवा पाणी पांढरट झाले, तर त्यात रसायनांचा वापर केल्याचे समजावे. (फोटो सौजन्य : फ्रीपिक) -
चवीवरून करा ओळख
नैसर्गिक पनीरची चव दुधाळ आणि ताजी असते, पण जर पनीर कडू, आंबट किंवा साबणासारख्या चवीचा लागत असेल तर त्याचे सेवन टाळावे. (फोटो सौजन्य : फ्रीपिक) -
आयोडीन आणि उष्णता चाचणी
पनीरवर आयोडीनचे थेंब टाकल्यास व त्याचा रंग निळा झाल्यास त्यात स्टार्चची भेसळ असते, तसेच शुद्ध पनीर तव्यावर गरम केल्यावर पूर्णपणे वितळत नाही. (फोटो सौजन्य : फ्रीपिक) -
हाताने चुरा करा
ताजे पनीर दुधासारखा सुवास देते, तर रसायने असलेले पनीर उग्र वास देते; तसेच बोटांनी चोळल्यावर पनीरचा गोळा न होता चुरा व्हायला हवा. (फोटो सौजन्य : फ्रीपिक) -
कुटुंबाच्या आरोग्यासाठी विश्वासार्ह ठिकाणाहूनच पनीर खरेदी करा किंवा शक्य असल्यास घरच्या घरी ताजे आणि शुद्ध पनीर तयार करण्यास प्राधान्य द्या. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
-
(टीप : येथे देण्यात आलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक महितीकरिता तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.) (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
मस्साजोगमध्ये संतोष देशमुखांच्या पत्नीचा पराभव का झाला? भावनिक लाटही चालली नाही, विजयी उमेदवार स्वरुपानंद देशमुख कोण?