-
गेल्या काही वर्षांत ॲव्होकॅडो (Avocado) हे फळ प्रचंड लोकप्रिय झाले आहे. विशेषतः ॲव्होकॅडो टोस्ट बनवताना अनेक जण घाईघाईत हे फळ कापतात. याच वेळी होणाऱ्या एका विशिष्ट प्रकारच्या दुखापतीला तज्ज्ञांनी ‘ॲव्होकॅडो हँड’ असे नाव दिले आहे. (फोटो: फ्रीपिक)
-
ॲव्होकॅडो हँड’ म्हणजे काय?
ॲव्होकॅडो कापताना चाकू हातातून निसटून थेट तळहातात किंवा बोटांमध्ये खोलवर घुसतो. यामुळे त्वचा, नस किंवा काही वेळा रक्तवाहिन्यांना गंभीर इजा होऊ शकते.
(फोटो: फ्रीपिक) -
चेंबूर येथील झेन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमधील सल्लागार गुडघा प्रत्यारोपण शल्यचिकित्सक डॉ. राकेश नायर यांच्या मते, अशा प्रकारच्या जखमांकडे दुर्लक्ष करू नये. ते म्हणाले, “कधी कधी जखम खोलपर्यंत गेल्यास बोटांची हालचाल कमी होऊ शकते किंवा सुन्नपणा येऊ शकतात,” असे ते सांगतात. . (फोटो: अनस्प्लॅश)
-
जखम झाल्यास काय करावे?
अशा प्रकारची दुखापत झाल्यास त्वरित योग्य प्राथमिक उपचार करणे महत्त्वाचे आहे. सर्वप्रथम जखम स्वच्छ पाण्याने धुवा. रक्तस्राव होत असल्यास स्वच्छ कापड किंवा पट्टीने दाब द्या .(फोटो: अनस्प्लॅश) -
जखम खोल असल्यास किंवा रक्त थांबत नसेल तर त्वरित डॉक्टरांकडे जा. डॉ. नायर यांच्या मते, “सुन्नपणा, बोटे हलवता न येणे किंवा सतत रक्तस्राव होणे ही गंभीर लक्षणे आहेत. अशावेळी वेळ वाया घालवू नये.” (फोटो: फ्रीपिक) -
काय करू नये?
हळद, टूथपेस्ट किंवा तेल यांसारखे घरगुती उपाय करू नयेत. स्वतः उपचार करण्याचा प्रयत्न टाळावा
असे केल्याने संसर्गाचा धोका वाढू शकतो. (फोटो: फ्रीपिक) -
ॲव्होकॅडो हँड’ कसा टाळावा?
तज्ज्ञांच्या मते, काही साध्या सवयी बदलल्यास ही दुखापत सहज टाळता येते. नेहमी ॲव्होकॅडो स्थिर पृष्ठभागावर ठेवून कापा. हातात धरून कापणे टाळा,
धारदार आणि नियंत्रित चाकू वापरा. तसेच, बोटे आत वाकवून (claw grip) सुरक्षित पकड ठेवा.
घाईगडबडीत ॲव्होकॅडो कापणे टाळा (फोटो: फ्रीपिक) -
ग्लेनेगल्स हॉस्पिटलचे अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. अनुप खत्री सांगतात की, “चुकीच्या पद्धतीने कठीण फळे कापल्यास गंभीर इजा होऊ शकते.” (फोटो: फ्रीपिक)
-
ॲव्होकॅडो आरोग्यासाठी फायदेशीर असले तरी ते कापताना निष्काळजीपणा केल्यास ते धोकादायक ठरू शकतो. योग्य पद्धतीने ॲव्होकॅडो कापणे आणि सावधगिरी बाळगल्यास अशा दुखापती टाळता येतात. (फोटो: फ्रीपिक)
अभ्यासात खूप हुशार असतात ‘या’ मूलांकाचे लोक, गुरुच्या आशीर्वादाने होतात करिअरमध्ये यशस्वी