-
उन्हाळ्यात आंबा खाणे केवळ चवीसाठीच नाही, तर आरोग्यासाठीही खूप फायदेशीर असते.
-
आंब्यामध्ये पाण्याचे प्रमाण भरपूर असते. कडाक्याच्या उन्हात आंबा खाल्ल्याने किंवा त्याचे पन्हे प्यायल्याने शरीरातील पाण्याची पातळी टिकून राहते आणि उष्माघाताचा धोका कमी होतो.
-
आंब्यामध्ये भरपूर फायबर आणि नैसर्गिक एन्झाइम्स असतात, जे पचनसंस्था सुरळीत ठेवण्यास मदत करतात.
-
यामुळे उन्हाळ्यात जाणवणारा बद्धकोष्ठता आणि अपचनाचा त्रास कमी होतो.
-
आंबा हा व्हिटॅमिन ‘सी’ आणि ‘ए’ चा उत्तम स्रोत आहे. यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि बदलत्या हवामानामुळे होणाऱ्या आजारांपासून संरक्षण मिळते.
-
आंब्यातील व्हिटॅमिन ‘ए’ डोळ्यांचे रक्षण करते. यामुळे डोळ्यांची जळजळ कमी होऊन दृष्टी सुधारण्यास मदत होते.
-
आंब्यातील अँटी-ऑक्सिडंट्स त्वचेला नैसर्गिक तजेला देतात आणि मुरुमांसारख्या समस्या दूर ठेवण्यास मदत करतात.
-
आंबा खाण्यापूर्वी तो किमान १ ते २ तास पाण्यात भिजवून ठेवावा. यामुळे त्यातील नैसर्गिक उष्णता (गरमी) कमी होते आणि तो शरीराला बाधत नाही.
-
कोणताही पदार्थ अतिप्रमाणात खाणे टाळावे. विशेषतः मधुमेहींनी आंबा खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा.
“लाज वाटली पाहिजे”, ‘भूत बंगला’च्या दिग्दर्शकाचे वक्तव्य; म्हणाले, “तब्बू अजिबात…”