-
मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री सोनाली खरे सध्या तिच्या परदेश दौऱ्यामुळे सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे.
-
सोनाली सध्या थायलंडमध्ये आपल्या सुट्ट्यांचा मनसोक्त आनंद घेत आहे.
-
तिने या खास व्हेकेशनचे काही ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर केले असून ते चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.
-
थायलंडमधील अतिशय निसर्गरम्य अशा ‘कोह सामुई’ बेटावर तिने हे सुंदर फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटमध्ये सोनालीने काळ्या रंगाचा एक अतिशय स्टायलिश आणि ग्लॅमरस वनपीस ड्रेस परिधान केल्याचे दिसत आहे.
-
या काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये तिचा लूक अत्यंत देखणा आणि लक्षवेधी वाटत आहे.
-
समुद्रकिनाऱ्यावरील पांढऱ्या शुभ्र वाळूत बसून तिने कॅमेऱ्यासमोर वेगवेगळ्या पोझ दिल्या आहेत.
-
तिच्या या फोटोंवर चाहते भरभरून कमेंट्स करत असून तिचा हा ग्लॅमरस लूक सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: सोनाली खरे/इन्स्टाग्राम)
पाकिस्तानचं लढाऊ विमान पाडणाऱ्या अभिनंदन वर्धमान यांची नवी इनिंग, गोव्यातल्या खासगी कंपनीत वैमानिक म्हणून कार्यरत