-
ज्योतिषशास्त्रानुसार मंगळाला साहस, पराक्रम, शौर्य, क्रोध, भूमी यांचा कारक ग्रह मानले जाते. त्यामुळे ज्या व्यक्तीच्या पत्रिकेत मंगळ शुभ स्थितीत असतो, असे लोक प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवण्यासाठी सक्षम असतात.
-
ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका निश्चित काळानंतर राशी परिवर्तन करतो. अनेकदा याचा फायदा काही राशींच्या व्यक्तींना होतो.
-
सध्या मंगळ मीन राशीत विराजमान असून ११ मे २०२६ रोजी मध्यरात्री १२ वाजून ४७ मिनिटांनी मंगळाचा मेष राशीत प्रवेश होईल.
-
मेष ही मंगळाचे स्वामीत्व असलेली राज असून मंगळाच्या या राशीतील प्रवेशाने १२ पैकी काही राशींच्या व्यक्तींचे भाग्य उजळेल.
-
मेष राशीच्या व्यक्तींनाही मंगळाचे राशी परिवर्तन शुभ फळ देणारे असेल. या काळात तुम्हाला अनेक आकस्मिक धनलाभ होतील. प्रेमसंबंध सुखमय होतील. नवे लोक, नवे छंद यांच्याशी जोडले जाल. शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम असेल.
-
मंगळाचे राशी परिवर्तन कन्या राशीच्या व्यक्तींसाठी खूप लाभदायी सिद्ध होईल. अविवाहितांची लग्ने जुळतील. नोकरी करणाऱ्या व्यक्तींच्या मेहनतीचे कौतुक होईल. या काळात तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खूश असतील. नवीन नोकरी शोधणाऱ्यांना मनासारखी नोकरी मिळेल.
-
कर्क राशीच्या व्यक्तींना देखील मंगळाच्या राशी परिवर्तनाचा चांगला फायदा होईल. त्यामुळे या काळात तुमच्या सुख-सुविधांमध्ये वाढ होईल. कुटुंबातही आनंदी आनंद असेल. स्पर्धा परीक्षेत यश मिळेल. तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खूश असतील. करिअरमध्ये चांगली प्रगती होईल.
-
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
-
(फोटो सौजन्य: AI)
वडील बिस्किट घ्यायला उतरले, तेवढ्यात वंदे भारत सुटली अन् ३ वर्षांची चिमुरडी एकटीच पुण्यात पोहचली; वाचा पुढे काय झाले…