-
ज्योतिषशास्त्रानुसार सूर्याला ग्रहांचा राजा मानले जाते. सूर्याचे प्रत्येक महिन्यात राशी परिवर्तन होते. कुंडलीत सूर्य शुभ असेल, तर व्यक्तीला आयुष्यात आत्मविश्वास, यश, मान-सन्मान, पैसा, पद यांसारख्या बऱ्याच गोष्टी प्राप्त होतात.
-
तसेच शनी ग्रहाला कर्मफळ दाता म्हटले जाते. सध्या सूर्य वृषभ राशीत असून शनीदेव मीन राशीत विराजमान आहे. पंचांगानुसार, ०२ मे २०२६ रोजी रात्री ११ वाजून २७ मिनिटांनी सूर्य आणि शनी एक अत्यंत शुभ योग निर्माण करत आहे, हा एक कोणीय योग आहे, ज्याला एकम-एकादश योग देखील म्हटले जाते.
-
ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा दोन ग्रह जवळपास ३३ डिग्री कोणीय स्थितीवर असतात तेव्हा हा योग निर्माण होतो. या योगाच्या शुऊ प्रभावाने १२ पैकी काही राशींच्या व्यक्तींचे नशीब चमकेल.
-
एकादश योग मेष राशीसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. कुटुंबीयांसोबत फिरायला जाल. हा काळ तुमच्यासाठी सकारात्मक सिद्ध होईल. आत्मविश्वासात वाढ होईल.
-
एकादश योग कर्क राशीच्या लोकांसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. आर्थिक समस्या दूर होतील. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. आयुष्यात सुख-समृद्धी वाढेल. कुटुंबीयांसोबत प्रवास घडेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे.
-
मकर राशींच्या व्यक्तींसाठी हा महिना खूप उत्तम सिद्ध होईल. या महिन्यात शुभ ग्रहाच्या युतीमुळे मकर राशीच्या व्यक्तींना नोकरी, व्यवसाय यश मिळेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठीदेखील हा काळ उत्तम आहे. कुटुंबातील जुने वाद मिटतील.
-
मीन राशींच्या व्यक्तींसाठीही हा योग खूप खास असणार आहे. या काळात नोकरी करणाऱ्यांची पगारवाढ होईल. तसेच अडकलेले पैसे मिळतील. तुम्हाला अनेक सुख, सुविधा प्राप्त होतील. अचानक धनलाभ होईल. या काळात तीर्थक्षेत्रांना भेट द्याल.
-
(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
-
(फोटो सौजन्य: AI)
ममता बॅनर्जींचा दारूण पराभव; भाजपाचे सुवेंदू अधिकारी १५ हजार मतांनी विजयी, भवानीपूरमध्ये भाजपाने कसे यश मिळवले?