-
चिरचिरत्या उन्हाचा आणि उष्ण लहरींचा शरीरासोबतच त्वचेवरही विपरीत परिणाम होतो. (फोटो सौजन्य : AI)
-
प्रखर सूर्यप्रकाशामुळे त्वचा पूर्णपणे होरपळून जाते आणि काळवंडण्याची समस्या निर्माण होते. (फोटो सौजन्य : AI)
-
बाहेरील महागडे साबण किंवा फेसवॉश अनेकदा त्वचेचे नैसर्गिक तेल काढून तिला कोरडे करतात. अशा वेळी नैसर्गिक पद्धतीने चेहरा स्वच्छ करणे आणि टॅनिंग घालवणे अत्यंत फायदेशीर ठरते. (फोटो सौजन्य : AI)
-
या घरगुती उपायासाठी तुम्हाला बेसन, मध व कच्चे दूध यांसारख्या गोष्टींची गरज आहे. (फोटो सौजन्य : AI)
-
एका वाटीत बेसन घेऊन, त्यात कच्चे दूध मिसळून त्याचे एक मऊ मिश्रण तयार करून घ्यावे. (फोटो सौजन्य : AI)
-
त्वचा कोरडी असल्यास मिश्रणात मध आणि तेलकट असल्यास लिंबाच्या रसाचे काही थेंब टाकावेत. (फोटो सौजन्य : AI)
-
चेहरा पाण्याने ओला करून, या मिश्रणाने दोन ते तीन मिनिटे हलक्या हाताने मसाज करावा. पाच मिनिटे हे मिश्रण चेहऱ्यावर तसेच ठेवून, नंतर थंड पाण्याने स्वच्छ धुऊन टाकावे. (फोटो सौजन्य : AI)
-
बेसन आणि दुधाचा हा वापर त्वचेला खोलवर पोषण देऊन नैसर्गिक गुलाबी चमक मिळवून देतो. (फोटो सौजन्य : AI)
-
(टीप : येथे देण्यात आलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक महितीकरिता तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.) (फोटो सौजन्य : AI)
Tamilnadu Election Results 2026 LIVE Updates : तमिळनाडू निवडणुकीत २ जागा जिंकणाऱ्या विजय यांचा मोठा निर्णय, एक जागा सोडणार असल्याची चर्चा