-
ज्योतिषशास्त्रानुसार मंगळाला साहस, पराक्रम, शौर्य, क्रोध, भूमी यांचा कारक ग्रह मानले जाते. त्यामुळे ज्या व्यक्तीच्या पत्रिकेत मंगळ शुभ स्थितीत असतो, असे लोक प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवण्यासाठी सक्षम असतात. ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका निश्चित काळानंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो.
-
अनेकदा याचा फायदा काही राशींच्या व्यक्तींना होतो. सध्या मंगळ मीन राशीत विराजमान असून लवकरच तो आपली स्वराशी असलेल्या मेष राशीत प्रवेश करेल.
-
पंचांगानुसार, मंगळ ११ मे २०२६ रोजी १२ वाजून ४७ मिनिटांनी मेष राशीत प्रवेश करेल, जो या राशीत २१ जून २०२६ पर्यंत विराजमान राहील. मंगळाचे हे गोचर नक्कीच काही राशींच्या व्यक्तींसाठी लाभदायी सिद्ध होईल.
-
मंगळाचे मेष राशीतील राशी परिवर्तन प्रवेश मेष राशीसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. फक्त मेहनत कायम ठेवा.
-
मंगळाचे राशी परिवर्तन मीन राशीसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. आर्थिक समस्या दूर होतील. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. आयुष्यात सुख-समृद्धी वाढेल. कुटुंबीयांसोबत प्रवास घडेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे.
-
धनु राशीच्या व्यक्तींसाठी मंगळाचे राशी परिवर्तन खूप लाभदायी सिद्ध होईल. हा काळ तुमच्यासाठी सकारात्मक सिद्ध होईल. मानसिक तणावातून मुक्त व्हाल. वैवाहिक जीवन सुखमय असेल. आत्मविश्वासात वाढ होईल. आनंदी वार्ता कानी पडतील. समाजात मानसन्मान वाढेल. -
कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी मंगळाचे राशी परिवर्तन खूपच फायदेशीर ठरेल. या काळात तुमच्या आयुष्यातील अनेक अडचणी दूर होतील. मनातील सर्व इच्छा-आकांक्षा पूर्ण होतील, गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. त्यामुळे हे राशी परिवर्तन तुमच्यासाठी खूप अनुकूल सिद्ध होईल.
-
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
-
(फोटो सौजन्य: AI)
Government Formation News 2026 Live Updates: विजयच्या शपथविधीचं काय झालं? घराबाहेरचे मेटल डिटेक्टर काढले, समर्थक आपापल्या घरी परतले!