-
ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक त्याच्या ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो ज्याचा शुभ-अशुभ प्रभाव मानवी जीवनावर पाहायला मिळतो. ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र एकमेव असा ग्रह आहे जो सर्वात वेगवान गतीने एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो.
-
तो एका राशीमध्ये जवळपास अडीच दिवस राहतो. त्यामुळे बऱ्याचदा काही राशींमध्ये चंद्राची दुसऱ्या ग्रहाबरोबर युती निर्माण होते. या युतीचा काही राशींच्या व्यक्तींवर शुभ तर काही राशींवर अशुभ परिणाम पाहायला मिळतो.
-
पंचांगानुसार, मागील अनेक दिवसांपासून देवगुरू बृहस्पती मिथुन राशीत विराजमान मे महिन्यामध्ये चंद्रदेव देखील मिथुन राशीत प्रवेश करतील. चंद्राच्या मिथुन राशीतील प्रवेशाने मिथुन राशीमध्ये गुरू ग्रहाबरोबर चंद्राची युती निर्माण होईल.
-
ज्योतिषशास्त्रामध्ये ही युती अतिशय लाभदायक मानली जाते. हे दोन ग्रह जेव्हा एकत्र येतात तेव्हा ‘गजकेसरी राजयोग’ निर्माण होतो. हा राजयोग १२ पैकी काही राशींच्या लोकांसाठी खूपच लाभदायी ठरेल.
-
कर्क राशीच्या लोकांसाठी गजकेसरी राजयोग खूप लाभदायी सिद्ध होईल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. या काळात खूप सकारात्मक विचार कराल. आयुष्यातील नवे बदल स्वीकारण्यास तयार व्हा. सगळीकडे चुमचे वर्चस्व असेल.
-
मिथुन राशीतील चंद्र-गुरूची युती वृषभ राशीसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. आर्थिक समस्या दूर होतील. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील. आयुष्यात सुख-समृद्धी वाढेल. नव्या नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नवी संधी मिळेल. बँक बॅलन्स झपाट्याने वाढेल. कुटुंबीयांसोबत प्रवास घडेल.
-
तूळ राशीच्या व्यक्तींसाठी मिथुन राशीतील गजकेसरी राजयोग खूप लाभदायी सिद्ध होईल. हा काळ तुमच्यासाठी सकारात्मक सिद्ध होईल. या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कुटुंबात शुभकार्ये होतील. आरोग्य तक्रारी बंद होतील. परदेशात जाण्याचे योग आहेत.
-
कन्या राशींच्या लोकांसाठी गजकेसरी राजयोग नक्कीच अत्यंत अनुकूल सिद्ध होईल. मनासारख्या गोष्टी करायला मिळतील. तीर्थक्षेत्रांना भेट देण्याचे प्रबळ योग जुळून येतील. अशक्य गोष्टी शक्य होतील. कामाच्या ठिकाणी कौतुक होईल. पगारवाढ होईल व उच्च पद देखील मिळू शकते.
-
चंद्राचा मिथुन राशीतील प्रवेश मीन राशीसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील.
-
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
-
(फोटो सौजन्य: AI)
Government Formation News 2026 Live Updates: विजयच्या शपथविधीचं काय झालं? घराबाहेरचे मेटल डिटेक्टर काढले, समर्थक आपापल्या घरी परतले!