-
ज्योतिषशास्त्रात मंगळाला भूमी, ऊर्जा आणि उत्साहाचा कारक ग्रह मानले जाते. तर बुध ग्रहाला वाणी, विद्या आणि बुद्धिचा कारक ग्रह मानले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन होते.
-
तर सूर्याला पिता, मान-सन्मान आणि आत्मविश्वासाचा कारक ग्रह मानले जाते. सूर्य ग्रह प्रत्येक महिन्यामध्ये राशी परिवर्तन करतो. -
पंचांगानुसार, ११ मे २०२६ रोजी ग्रहांचा सेनापती मंगळ मेष राशीत प्रवेश करणार असून या राशीत आधीपासूनच सूर्यदेव देखील विराजमान आहे.
-
मेष राशीत मंगळ-सूर्य एकत्र आल्यामुळे या राशीत ‘मंगलादित्य राजयोग’ निर्माण होईला. हा योग १२ पैकी काही राशींच्या लोकांसाठी खूपच लाभदायी असेल.
-
कर्क राशीच्या व्यक्तींसाठी मंगळ-सूर्याची युती तुम्हाला आकस्मिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल. मान-सन्मान वाढेल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ खूप अनुकूल असेल.
-
मंगळ-सूर्याच्या युतीमुळे मीन राशीच्या व्यक्तींना आयुष्यात अनेक चांगले बदल पाहायला मिळतील. या काळात तुमची आर्थिक स्थिती मजबूत असेल. पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यात प्रगती होईल. प्रत्येक क्षेत्रात यश मिळवाल.
-
मंगळ-सूर्याच्या युतीचे धनु राशीच्या व्यक्तींना अनेक सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील. या काळात कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. जोडीदाराबरोबरचे नाते अधिक घट्ट होईल. कर्ज फेडण्यास मदत होईल.
-
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
-
(फोटो सौजन्य: AI)
ना स्मोकिंग ना ड्रिंकिंग… तरीही दीपिका कक्करला पुन्हा कॅन्सर; ‘ही’ साधी लक्षणं दिसताच सावध व्हा, दीपिकानं स्वत: सांगितलं