-
ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे काही निश्चित कालावधीनंतर राशी परिवर्तन होते; ज्याचा प्रभाव १२ राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य प्रत्येक महिन्यात राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो.
-
ज्योतिषशास्त्रात सूर्याला आत्मा आणि पित्याचा कारक ग्रह मानला जातो. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत सूर्य मजबूत असतो, त्या व्यक्तीला आयुष्यात भरपूर यश, सुख, पद-प्रतिष्ठा, मान-सन्मान प्राप्त होतो. इतर ग्रहांप्रमाणेच सूर्यदेखील ठराविक काळानंतर राशी परिवर्तन करतो.
-
सूर्याच्या परिवर्तनामुळे १२ राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात विविध बदल आपल्याला पाहायला मिळतात.
-
पंचागानुसार, सूर्य सध्या मेष राशीत असून तो १५ मे २०२६ रोजी शुक्राच्या वृषभ राशीमध्ये प्रवेश करणार आहे. या राशीत तो महिनाभर राहील. याच काळात अधिक महिना देखील सुरू होईल. ज्यामुळे काही राशींच्या लोकांवर त्याचा प्रभाव पडलेला पाहायला मिळेल. -
मेष राशीच्या व्यक्तींना सूर्याचे राशी परिवर्तन खूप लाभदायी असेल. कर्क राशीच्या दहाव्या घरात सूर्य विराजमान होणार आहे. हे राशी परिवर्तन तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली होईल आणि तुम्ही जमीन आणि वाहन खरेदीच्या दिशेने वाटचाल कराल. या काळात तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होईल.
-
वृश्चिक राशीच्या व्यक्तींना सूर्याचे वृषभ राशीत प्रवेश अत्यंत शुभ सिद्ध होईल. या काळात तुम्हाला काम आणि व्यवसायात प्रचंड यश मिळेल आणि उत्पन्नात प्रचंड वाढ होईल. तसेच, बेरोजगार लोकांना यावेळी नवीन नोकरी मिळू शकते. -
ज्योतिषशास्त्रानुसार सूर्याचे राशी परिवर्तन मकर राशीच्या व्यक्तींना विशेष लाभदायी असेल. या राशी परिवर्तनामुळे आकस्मिक धनलाभ होतील. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. या काळात अनेक भौतिक सुखे प्राप्त होतील. -
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
-
(फोटो सौजन्य: AI)
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंची पुन्हा बदली? मुख्यमंत्र्यांसह सरकारला थेट इशारा