-
नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ (Sairat Movie) या चित्रपटामुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) आणि अरबाज शेख (Arbaj Shaikh) ही जोडी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
-
२०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ऐतिहासिक ‘सैराट’ चित्रपटाला आता १० वर्षे पूर्ण झाली आहेत.
-
या निमित्ताने रिंकू आणि अरबाजने केलेले एक खास फोटोशूट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
-
या व्हायरल फोटोंमध्ये रिंकूने स्ट्राइप्ड शर्ट आणि पॅण्ट परिधान करून एक कूल लूक कॅरी केला आहे, तर अरबाजने प्रिंटेड को-ऑर्ड सेटमध्ये त्याला उत्तम साथ दिली आहे.
-
या दोघांमधील मैत्री आणि पडद्यावरची केमिस्ट्री चाहत्यांना आजही तितकीच भावत आहे.
-
दोघांच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. “खूप छान”, “मस्त जोडी” आणि “सुंदर फोटो” अशा प्रतिक्रिया देत नेटकऱ्यांनी ‘सैराट’च्या आठवणींना उजाळा दिला आहे.
-
काही दिवसांपूर्वीच अरबाज शेखने त्याची मैत्रीण सिमरन हिच्याशी निकाह केला. त्यांच्या लग्नाचे फोटोही सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले होते, ज्यामध्ये दोघांनी सोनेरी रंगाच्या कपड्यांमध्ये ‘ट्विनिंग’ केले होते.
-
(सर्व फोटो सौजन्य : रिंकू राजगुरू आणि अरबाज शेख/इन्स्टाग्राम)
Robert Kiyosaki: “आता पैशाच्या इतिहासातील सर्वात कठीण काळ सुरू होतोय!”; ‘रिच डॅड पुअर डॅड’च्या रॉबर्ट कियोसाकींचे भाकीत