-
अभिनेता विशाल निकम आणि अभिनेत्री अक्षया हिंदळकर ही जोडी सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
-
विशाल आणि अक्षया ही मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडी असून नुकतेच त्यांचे लग्न झाले आहे.
-
या नवविवाहित जोडीने आपल्या सुखी संसारासाठी आई तुळजाभवानीचा आशीर्वाद घेण्यासाठी तुळजापूर गाठले.
-
विशाल आणि अक्षया येथे दर्शनासाठी आले असून लग्नानंतरचा त्यांचा हा खास प्रवास आहे.
-
यावेळी विशालने फिकट जांभळ्या रंगाचा पारंपारिक कुर्ता परिधान केला असून तो अतिशय देखणा दिसत आहे.
-
अक्षयाने गुलाबी रंगाची सुंदर पैठणी परिधान केली असून कपाळावर लावलेल्या भंडारा टिळ्यामुळे तिचे सौंदर्य अधिकच खुलले आहे.
-
आपल्या पोस्टला कॅप्शन देताना अक्षयाने ‘तुळजापूर’ असे लिहून सोबत हृदय आणि सुर्यफुलाचे इमोजी वापरले आहेत.
-
आई तुळजाभवानीच्या दरबारातील त्यांचे हे साधे आणि सात्विक फोटो सध्या चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य: अक्षया हिंदळकर/इन्स्टाग्राम)
‘झुंजुर-मुंजुर पाऊस माऱ्यानं’, गाण्यावर तरूणींनी धरला ठेका; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “अंगभर पेहराव करून…”