-
झी मराठी वाहिनीवरील ‘खुलता कळी खुलेना’ (Khulta Kali Khulena TV Serial) या मालिकेने प्रेक्षकांची विशेष पसंती मिळवली होती.
-
या मालिकेतील आगळीवेगळी कथा आणि विशेषतः त्याचं शीर्षकगीत प्रेक्षकांच्या आजही तितकंच लक्षात आहे.
-
या मालिकेमुळेच अभिनेत्री अभिज्ञा भावे (Abhidnya Bhave) आणि अभिनेता ओमप्रकाश शिंदे (Omprakash Shinde) हे घराघरात पोहोचले.
-
नुकतेच या जोडीने सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका नवीन फोटोशूटची जोरदार चर्चा रंगली आहे.
-
या फोटोशूटमध्ये अभिज्ञाने पेस्टल रंगाच्या साडीत सौंदर्याची मोहोर उमटवली आहे, तर ओमप्रकाश काळ्या रंगाचा शर्ट, पॅन्ट आणि जॅकेटमध्ये अतिशय देखणा दिसत आहे.
-
विशेष म्हणजे, ओमप्रकाशने या फोटोंना दिलेले कॅप्शन सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
-
त्याने लिहिले की, “हे फोटोशूट सर्वस्वी ‘भावेंच्या’ (अभिज्ञा) मार्गदर्शनाखाली पार पडले आहे. यात चेहेरा गंभीर ठेवणे आणि ॲटिट्यूड दाखवणे अपेक्षित होते.”
-
(सर्व फोटो सौजन्य : अभिज्ञा भावे/इन्स्टाग्राम)
“मी सर्व समर्थकांची माफी मागतो”, मोर्चाच्या दुसऱ्या दिवशी अभिजीत दिपकेंचं विधान चर्चेत; जखमी आंदोलकांना केलं महत्त्वाचं आवाहन