-
ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक त्याच्या ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो ज्याचा शुभ-अशुभ प्रभाव मानवी जीवनावर पाहायला मिळतो.
-
ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र एकमेव असा ग्रह आहे जो सर्वात वेगवान गतीने एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. तो एका राशीमध्ये जवळपास अडीच दिवस राहतो. त्यामुळे बऱ्याचदा काही राशींमध्ये चंद्राची दुसऱ्या ग्रहाबरोबर युती निर्माण होते. या युतीचा काही राशींच्या व्यक्तींवर शुभ तर काही राशींवर अशुभ परिणाम पाहायला मिळतो.
-
पंचांगानुसार, चंद्र १४ मे २०२६ रोजी रात्री १० वाजून ३३ मिनिटांनी अश्विनी नक्षत्रात गोचर करेल. चंद्राचे हे गोचर काही राशींच्या व्यक्तींसाठी अत्यंत अनुकूल ठरेल.
-
चंद्राचे नक्षत्र गोचर मेष राशीसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. फक्त मेहनत कायम ठेवा.
-
चंद्राचे नक्षत्र गोचर मिथुन राशीच्या लोकांसाठी खूप अनुकूल ठरणार आहे. या काळात आर्थिक समस्या दूर होतील. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. आयुष्यात सुख-समृद्धी वाढेल. कुटुंबीयांसोबत प्रवास घडेल.
-
सिंह राशीच्या व्यक्तींसाठी चंद्राचे नक्षत्र गोचर खूप लाभदायी सिद्ध होईल. हा काळ तुमच्यासाठी सकारात्मक सिद्ध होईल. आत्मविश्वासात वाढ होईल. आनंदी वार्ता कानी पडतील. समाजात मानसन्मान वाढेल. या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कुटुंबात शुभकार्ये होतील.
-
धनु राशीच्या व्यक्तींसाठी चंद्राचे नक्षत्र गोचर खूप लाभकारी सिद्ध होईल. या काळात तुमच्या आयुष्यात आनंदी आनंद येईल, तणावमुक्त व्हाल. आयुष्यात मानसिक शांती मिळेल. कुटुंबातील व्यक्तींची मदत होईल.
-
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
-
(फोटो सौजन्य: AI)
धनलाभ होणार धनलाभ! आज गायत्री जयंतीला चंद्राचे नक्षत्र गोचर ‘या’ चार राशींना चौपट पैसा देणार; पदोपदी भरपूर यश मिळणार