-
‘वीण दोघांतली ही तुटेना’ ही सध्याच्या काळातील अतिशय लोकप्रिय मालिकांपैकी एक म्हणून ओळखली जाते.
-
अभिनेता सुबोध भावेने या मालिकेत ‘समर’ ही व्यक्तिरेखा उत्तमरीत्या पडद्यावर जिवंत केली आहे. तर दुसरीकडे अभिनेत्री तेजश्री प्रधाननं ‘स्वानंदी’ची भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे.
-
मालिकेच्या रंजक वळणावर आता अभिनेत्री पूर्वा गोखलेची एन्ट्री झाली असून, ती समरच्या एक्स गर्लफ्रेंडची म्हणजेच ‘किमया’ची भूमिका साकारत आहे.
-
पूर्वा गोखलेनं नुकतंच तिचं एक नवीन फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केलं असून, या फोटोंना तिनं ‘KIMAYA’ अशी कॅप्शन दिली आहे.
-
या फोटोशूटमध्ये पूर्वानं गडद निळ्या रंगाचा एक अतिशय सुंदर आणि स्टायलिश गाऊन परिधान केल्याचे दिसत आहे.
-
या वेस्टर्न लूकला साजेसे कानातले आणि हातातील घड्याळ तिच्या सौंदर्यात अधिकच भर घालत आहे.
-
तिचे मोकळे केस आणि चेहऱ्यावरील मनमोहक हास्याने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले असून, तिच्या या फोटोंवर लाइक्सचा वर्षाव होत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: पूर्वा गोखले /इन्स्टाग्राम)
गॅस अॅसिडिटी कधीच होणार नाही, सकाळीच पोट झटक्यात होईल साफ; फक्त आठवड्यातून दोनदा ‘ही’ भाजी खा