-
महिलांमध्ये सर्रास आढळणाऱ्या ‘पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम’ (PCOS) या आजाराचे नाव आता बदलून, ‘पॉलीएंडोक्राइन मेटाबॉलिक ओव्हेरियन सिंड्रोम’ (PMOS) असे करण्यात आले आहे.
-
आजकाल अनेक महिला आणि तरुणींमध्ये ‘PMOS’ या गंभीर हार्मोनल आजाराचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याचे दिसून येत आहे.
-
पाळीतील अनियमितता
मासिक पाळी वेळेवर न येणे, उशिरा येणे किंवा रक्तस्राव कमी होणे ही या आजाराची प्राथमिक लक्षणे आहेत. -
पोटाचा घेरा वाढणे
आहारात बदल न करताही अचानक वजन वाढणे आणि विशेषतः पोटावर चरबी साठणे यांकडे दुर्लक्ष करू नका. -
त्वचा आणि केसांमधील बदल
चेहऱ्यावर मुरमे येणे, त्वचा तेलकट होणे व डोक्याचे केस विरळ होणे हे शरीरातील बदलांचे संकेत आहेत. -
अनावश्यक केसांची वाढ
ओठांच्या वरच्या भागात किंवा हनुवटीवर जाड काळे केस येणे हे संप्रेरकांच्या (हार्मोन) असंतुलनाचे लक्षण आहे. -
झोप आणि स्वभावात बदल
पुरेशी झोप घेऊनही थकवा जाणवणे, निद्रानाश आणि कारणाशिवाय चिडचिड किंवा अस्वस्थता वाटू शकते. -
त्वचेवर काळे चट्टे
मान, काख किंवा जांघेतील त्वचा काळवंडणे आणि जाड होणे हे या आजाराचे एक मुख्य लक्षण आहे. -
(टीप : येथे देण्यात आलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक महितीकरिता तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
भाजपवर वाढता दबाव; जंतरमंतरवर वाढती गर्दी; विरोधकांच्या पाठिंब्याने देशभर आंदोलनाची व्याप्ती