-
तुळशीला प्रखर उन्हाचा त्रास होतो. शक्य असल्यास रोप सावलीत ठेवा किंवा ‘ग्रीन नेट’ किंवा पातळ सुती कापडाचा वापर करून सावली करा.
-
उन्हाळ्यात तुळशीला दिवसातून दोनदा पाणी द्यावे. सकाळी लवकर आणि संध्याकाळी सूर्यास्तानंतर पाणी देणे सर्वोत्तम ठरते.
-
दुपारी कडक उन्हात पाणी देणे टाळावे, कारण यामुळे मुळांना इजा होऊ शकते.
-
कुंडीतील मातीतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी मातीवर सुका पालापाचोळा किंवा लाकडाचा भुसा टाका.
-
तुळशीला जेव्हा मंजिरी (बिया) येतात, तेव्हा झाडाची ऊर्जा बिया तयार करण्यात खर्च होते आणि वाढ थांबते.
-
रोप हिरवेगार ठेवण्यासाठी या मंजिरी वेळोवेळी खुडून टाकाव्यात.
-
उन्हाळ्यात कडक रासायनिक खते वापरणे टाळावे. त्याऐवजी शेणखत, गांडूळ खत किंवा घरगुती कंपोस्ट वापरावे.
-
रोपावर कीड किंवा काळी बुरशी पडल्यास रासायनिक औषधांऐवजी कडुलिंबाच्या तेलाचा स्प्रे किंवा हळदीच्या पाण्याचा वापर करा.
आई गं, “गोऱ्या गोऱ्या टाचत काटा रुतला” गाण्यावर चिमुकलीची लावणी; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “ही खूप मोठी कलाकार होणार”