-
खाद्यसंस्कृतीमध्ये पुलाव या पदार्थाला एक मानाचे स्थान आहे. वेगवेगळ्या प्रांतानुसार आणि पद्धतीनुसार पुलावचे अनेक प्रकार बनवले जातात. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
-
नारळाच्या दुधाचा पुलाव (Coconut Milk Pulao)
पाण्याऐवजी नारळाचे दूध वापरून बनवलेला हा पुलाव कमालीचा मऊ आणि हलकासा गोडसर स्वाद देणारा असतो. (फोटो सौजन्य : wikimedia commons) -
काबुली पुलाव (Kabuli Pulao)
अफगाणिस्तानचा हा पारंपरिक पुलाव तांदूळ, वाळलेली द्राक्षे, चवदार गाजर आणि शिजवलेले मऊ मांस यांच्या मिश्रणातून एक वेगळीच गोड अशी नेमकी चव देतो. (फोटो सौजन्य : wikimedia commons) -
मोती पुलाव (Moti Pulao)
मुघल काळातील हा शाही पदार्थ आहे. त्यामध्ये चांदीचा वर्ख लावलेले किंवा अंड्यांच्या पिवळ्या भागापासून बनवलेले खाण्यायोग्य ‘मोती’ वापरले जातात. (फोटो सौजन्य : wikimedia commons) -
नवरत्न पुलाव (Navratan Pulao)
विविध प्रकारच्या भाज्या, सुकामेवा, फळे आणि सुवासिक मसाल्यांनी समृद्ध असलेला हा पुलाव सणासुदीच्या बेतासाठी उत्तम मानला जातो. (फोटो सौजन्य : wikimedia commons) -
मटार पुलाव (Peas Pulao)
बनवायला अत्यंत सोपा आणि तरीही मनाला तृप्त करणारा हा पुलाव सुवासिक तांदूळ, गोड हिरवे मटार आणि खड्या मसाल्यांच्या मिश्रणातून तयार होतो. (फोटो सौजन्य : फ्रीपिक) -
तहारी (Tahari)
अवधी खाद्यसंस्कृतीमधील हा एक साधा, पण चवदार प्रकार आहे. त्यामध्ये प्रामुख्याने बटाटे आणि सौम्य मसाल्यांचा वापर करून एकभांडी सुटसुटीत जेवण बनवले जाते. (फोटो सौजन्य : wikimedia commons) -
यखनी पुलाव (Yakhni Pulao)
मांसाच्या अळणी पाण्यात (सूपमध्ये) शिजवलेला हा पुलाव काश्मीर आणि उत्तर भारतात अत्यंत लोकप्रिय आहे. त्याचा सुगंध आणि चव अतिशय उत्कृष्ट असते. (फोटो सौजन्य : wikimedia commons) -
जर्दा पुलाव (Zarda Pulao)
केशर, साखर, सुकामेवा आणि विविध फळांचा वापर करून बनवला जाणारा हा पिवळजर्द गोड पुलाव कोणत्याही आनंदाच्या प्रसंगी आवर्जून बनवला जातो. (फोटो सौजन्य : wikimedia commons)
‘फिल्टरपाड्याचा बच्चन’ पोहोचला गावी! गौरव मोरेने शेअर केले शेतातील फोटो; चाहत्यांनी सांगितलं गावाचं नाव, म्हणाले…