-
ज्योतिषशास्त्रानुसार बुध ग्रहाला वाणी, व्यापार व बुद्धीचा कारक ग्रह मानला जातो. चंद्रानंतर बुध ग्रहदेखील जलद गतीने राशी परिवर्तन करणारा ग्रह आहे. मे महिन्यात बुध दोन वेळा राशी परिवर्तन करणार आहे.
-
ज्यात सर्वात आधी तो १५ मे रोजी वृषभ राशीमध्ये प्रवेश करेल आणि २९ मे रोजी मिथुन राशीमध्ये प्रवेश करेल. बुधाच्या एकाच महिन्यातील दोन वेळा होणाऱ्या राशी परिवर्तनाने काही राशींना त्याचे शुभ परिणाम पाहायला मिळतील. या व्यक्तींना धन-संपत्ती, नोकरी, मान-सन्मान प्राप्त होईल.
-
वृषभ राशीच्या व्यक्तींना बुध ग्रहाचे राशी परिवर्तन खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा सहज पूर्ण होतील. मेहनतीचे फळ मिळेल आणि विद्यार्थ्यांनाही हवे तसे यश मिळेल.
-
बुधाचे मे महिन्यात होणारे राशी परिवर्तन मेष राशीच्या व्यक्तींसाठी लाभदायक मानले जाईल. या काळात तुमच्या आयुष्यात सकारात्मक परिणाम पाहायला मिळेल. कर्ज फेडण्यास मदत होईल. इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीची इच्छा पूर्ण होईल.
-
वृषभ राशीतील बुधाचे गोचर सिंह राशीच्या व्यक्तींनाही फायदेशीर ठरले. या काळात तुम्हाला अनेक आकस्मिक धनलाभ होतील. प्रत्येक कामात कुटुंबीयांची साथ मिळेल. तुमच्या सर्व अडचणी दूर होतील. दूरचे प्रवासही घडतील.
-
बुध ग्रहाचे संक्रमण वृश्चिक राशीच्या व्यावसायिक वाढीसाठी आणि प्रगतीसाठी अनुकूल आहे. सासरच्या मंडळींकडून किंवा जवळच्या मित्रांकडून पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. सरकारी कार्यालयांमध्ये अडकलेली कामे पूर्ण होऊ शकतात.
-
बुध ग्रहाचे संक्रमण कन्या राशीसाठी अत्यंत फायदेशीर असून ते वरदान ठरेल. तुम्ही हुशारीने आणि विवेकबुद्धीने काम केल्यास तुमच्या योजना यशस्वी होतील. सरकारी कामात आणि निविदा प्रकरणांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. -
(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
-
(फोटो सौजन्य: AI)
आजपासून सूर्याचे मिथुन राशीत पदार्पण; ‘या’ ५ राशींवर होणार पैशांचा पाऊस, तर ‘या’ राशींना आरोग्याची घ्या काळजी