-
ज्योतिषशास्त्रानुसार मंगळाला साहस, पराक्रम, शौर्य, क्रोध, भूमी यांचा कारक ग्रह मानले जाते. त्यामुळे ज्या व्यक्तीच्या पत्रिकेत मंगळ शुभ स्थितीत असतो, असे लोक प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवण्यासाठी सक्षम असतात.
-
ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका निश्चित काळानंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो. अनेकदा याचा फायदा काही राशींच्या व्यक्तींना होतो. सध्या मंगळ कन्या राशीत विराजमान असून उत्तराफाल्गुनी नक्षत्रामध्ये विराजमान आहे.
-
पंचांगानुसार, मंगळ शुक्रवार, २९ मे २०२६ रोजी पहाटे ६ वाजून ३४ मिनिटांनी भरणी नक्षत्रात प्रवेश करणार असून शुक्राच्या सहवासातील मंगळाचे हे संक्रमण प्रचंड सर्जनशील ऊर्जा आणि प्रबळ इच्छाशक्ती प्रदान करते.
-
ग्रहांचा अधिपती असलेल्या मंगळाचे हे संक्रमण तीन राशींसाठी शुभ ठरू शकते. -
सिंह राशीच्या व्यक्तींसाठी मंगळाचे गोचर खूप लाभदायी सिद्ध होईल. या काळात तुम्हाला आकस्मिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. भाग्याची साथ मिळेल. कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल. मान-सन्मान वाढेल.
-
मंगळाचे राशी परिवर्तन मेष राशीच्या व्यक्तींना आयुष्यात अनेक चांगले बदल पाहायला मिळतील. या काळात तुमची आर्थिक स्थिती मजबूत असेल. या काळात भौतिक सुख प्राप्त होईल. प्रत्येक क्षेत्रात यश मिळवाल. स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळेल. -
धनु राशीच्या व्यक्तींना अनेक सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील. या काळात कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. अचानक धनलाभ होतील, आयुष्यात अनेक मोठे बदल पाहायला मिळतील. जोडीदाराबरोबरचे नाते अधिक घट्ट होईल. कर्ज फेडण्यास मदत होईल.
-
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
-
(फोटो सौजन्य: AI)
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंची पुन्हा बदली? मुख्यमंत्र्यांसह सरकारला थेट इशारा