-
७९ व्या ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल’मध्ये यंदा पहिल्यांदाच मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळीने उपस्थिती लावली होती. मराठमोळ्या अंदाजात तिने रेड कार्पेटवर दमदार एन्ट्री घेतली.
-
मोरपिशी रंगाची नऊवारी साडी, त्यावर भरजरी शेला, गळ्यात ठुशी, हातात मराठमोळे तोडे, कमरपट्टा असा पारंपरिक साज करून प्राजक्ता कान्सच्या रेड कार्पेटवर चालली.
-
कान्स सोहळ्याचं प्राजक्ताचं हे पहिलंच वर्ष होतं. मात्र, तिचा आत्मविश्वास, रेड कार्पेटवर ज्याप्रकारे तिने सर्वांना अभिवादन केलं…हे पाहून सगळेजण भारावून गेले आहेत.
-
प्राजक्ताचे रेड कार्पेटवरील फोटो सध्या सर्वत्र व्हायरल होत आहेत. याचबरोबर तिने कान्सच्या समुद्रकिनारी सुद्धा खास फोटोशूट केलं आहे.
-
या फोटोंच्या कॅप्शनमध्ये प्राजक्ता लिहिते, “काय लिहू? तुम्हा सर्वांचं प्रेम पाहून छान वाटलं. फक्त कृतज्ञता व्यक्त करते!”
-
प्राजक्ताने या सोहळ्याला पेशवाई सिल्क नऊवारी साडी नेसली होती, आणि तिने संपूर्ण ज्वेलरी तिच्या स्वत:च्या ‘प्राजक्तसाज’ ब्रँडची परिधान केली होती.
-
रेड कार्पेटवर प्राजक्ताने ११५ वर्षे जुनी नथ परिधान केली होती. ही एका रॉयल कुटुंबाची नथ असल्याचं तिने कॅप्शनमध्ये सांगितलं आहे. तसेच लवकरच ही नथ ‘प्राजक्तसाज’च्या कलेक्शनमध्येही उपलब्ध केली जाईल, असंही तिने लिहिलं आहे.
-
प्राजक्ताच्या या फोटोंवर अमृता खानविलकरने “ओह कमाल…” अशी कमेंट केली आहे. तर ऋतुजा बागवेने तिला “दृष्ट काढ…” असं कमेंट्समध्ये सांगितलं आहे.
-
सध्या संपूर्ण मराठी कलाविश्वातून प्राजक्तावर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे. आज ( १९ मे ) अभिनेत्री भारतात सुद्धा परतली आहे. ( सर्व फोटो सौजन्य : abhijatmarathiott, प्राजक्ता माळी इन्स्टाग्राम )
“मी सर्व समर्थकांची माफी मागतो”, मोर्चाच्या दुसऱ्या दिवशी अभिजीत दिपकेंचं विधान चर्चेत; जखमी आंदोलकांना केलं महत्त्वाचं आवाहन