-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘लपंडाव’ (Lapandav TV Serial) या मालिकेला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
-
काही दिवसांपूर्वीच या मालिकेने २०० भागांचा यशस्वी टप्पा पार केला आहे.
-
या लोकप्रिय मालिकेत मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रुपाली भोसले (Rupali Bhosle) ‘तेजस्विनी’ ही मुख्य भूमिका साकारत आहे.
-
नुकतेच रुपालीने इन्स्टाग्रामवर आपल्या सोज्वळ लूकचे काही सुंदर फोटो शेअर केले आहेत, ज्यांनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
-
या फोटोंमध्ये रुपालीने राखाडी रंगाची कॉटन साडी आणि त्यावर खणाचा ब्लाऊज परिधान केला आहे.
-
हातात फूल घेऊन तिने दिलेल्या वेगवेगळ्या पोज रुपालीच्या सौंदर्यात आणखीनच भर घालत आहेत.
-
दरम्यान, ‘लपंडाव’ मालिकेचे कथानक सध्या अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचले असून, पुढे काय घडणार याबद्दल प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : रुपाली भोसले/इन्स्टाग्राम)
आवडती अभिनेत्री कोण? प्रश्न विचारताच तुकाराम मुंढे हसले आणि म्हणाले; “मी..”