-
‘कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२६’ (Cannes Film Festival 2026) मध्ये ज्येष्ठ मराठी अभिनेत्री निवेदिता सराफ आणि मराठी चित्रपटसृष्टीचे महानायक अशोक सराफ यांनी रेड कार्पेटवर हजेरी लावत एक नवा इतिहास रचला आहे.
-
७९ व्या कान्स चित्रपट महोत्सवातील या ज्येष्ठ दांपत्याच्या उपस्थितीने जागतिक स्तरावर मराठी संस्कृतीचा डंका वाजवला आहे.
-
निवेदिता सराफ यांनी सोशल मीडियावर या जागतिक सोहळ्यातील काही खास फोटो शेअर केले आहेत.
-
कान्सच्या रेड कार्पेटवर निवेदिता यांनी अस्सल महाराष्ट्रीयन संस्कृतीचे दर्शन घडवले.
-
निवेदिता यांनी शेअर केलेल्या फोटोंमध्ये त्यांनी राखाडी रंगाच्या कुर्ता-पॅण्टवर परिधान केलेली जांभळी पैठणी ओढणी सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. त्यांच्या या लूकचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे.
-
अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांचा हा दौरा केवळ रेड कार्पेट पुरता मर्यादित नव्हता. कान्स चित्रपट महोत्सवातील ‘इंडियन पॅव्हेलियन’ (Indian Pavilion) मध्ये ‘अभिजात मराठी’ (Abhijat Marathi) या आंतरराष्ट्रीय मराठी ओटीटी प्लॅटफॉर्मचा भव्य ग्लोबल लाँच करण्यात आला.
-
याच निमित्ताने जागतिक पातळीवर मराठी मनोरंजन क्षेत्राचे प्रतिनिधित्व करण्यासाठी हे ज्येष्ठ दांपत्य कान्स येथे पोहोचले होते.
-
(सर्व फोटो सौजन्य : निवेदिता सराफ/इन्स्टाग्राम)
Robert Kiyosaki: “आता पैशाच्या इतिहासातील सर्वात कठीण काळ सुरू होतोय!”; ‘रिच डॅड पुअर डॅड’च्या रॉबर्ट कियोसाकींचे भाकीत