-
ज्योतिषशास्त्रात राहू-केतू या दोन्ही ग्रहांना मायावी ग्रह म्हटले जाते. हे दोन्ही ग्रह इतर ग्रहांप्रमाणेच आपले राशी परिवर्तन करतात. ज्यामुळे या ग्रहांच्या बदलाचा चांगला-वाईट परिणाम सर्व राशींवर होतो.
-
या ग्रहांची एखाद्यावर शुभ दृष्टी असल्यास त्या व्यक्तीचे भाग्य उजळते. तसेच अशुभ दृष्टी असल्यास व्यक्तीला आयुष्यात अनेक संकटांचा सामना करावा लागू शकतो.
-
दरम्यान, ३१ मे २०२६ रोजी राहूचे गोचर शततारका नक्षत्राच्या पहिल्या पदामध्ये होईल, जो या पदामध्ये ०२ ऑगस्टपर्यंत राहील. राहूचे हे गोचर नक्कीच १२ पैकी काही राशींसाठी अनुकूल सिद्ध होईल.
-
ज्योतिषशास्त्रानुसार, राहू स्वतः शतभिषा नक्षत्राचा (कुंभ राशीचा) स्वामी आहे. जेव्हा राहू स्वगृही नक्षत्रात भ्रमण करतो, तेव्हा त्याची शक्ती, गूढ क्षमता आणि प्रभाव अनेक पटींनी वाढते. राहूचे हे भ्रमण जीवनात अनपेक्षित बदल, नवीन शोध आणि आंतरिक शक्ती यांचा एक दुर्मिळ संयोग निर्माण करेल.
-
मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी खूप शुभ परिणाम देणारा असेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. या काळात खूप सकारात्मक विचार कराल. आयुष्यातील नवे बदल स्वीकारण्यास तयार व्हा.
-
तूळ राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ अनेक आनंदी वार्ता घेऊन येईल. आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे फळ लाभेल. सगळीकडे चुमचे वर्चस्व असेल. फक्त मेहनत कायम ठेवा.
-
कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी या काळात अनेक लाभकारी परिणाम पाहायला मिळतील. तीर्थक्षेत्रांना भेट द्याल. नवीन वाहन, प्रॉपर्टी विकत घेऊ शकता. अडकलेले पैसे परत मिळतील. नोकरी-व्यवसायात पदोन्नती होईल.
-
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.) -
(फोटो सौजन्य: AI)
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंची पुन्हा बदली? मुख्यमंत्र्यांसह सरकारला थेट इशारा