-
भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली त्याच्या संतुलित शाकाहारी आहारासाठी ओळखला जातो, जो त्याला मैदानावर आणि मैदानाबाहेर नेहमीच ऊर्जावान ठेवतो.
-
त्याच्या आहारात सॅलेड, सूप आणि ऊर्जा पेयांचा समावेश असतो, ज्यातून त्याला प्रथिने आणि आवश्यक पोषक तत्त्वे मुबलक प्रमाणात मिळतात.
-
विराटच्या अत्यंत आवडत्या पदार्थांपैकी एक म्हणजे ‘सुपरफूड समर सॅलेड’ असून, त्याच्या दिल्लीतील ‘वन एट कम्यून’ या उपाहारगृहातही या पदार्थाला विशेष स्थान आहे.
-
हे सॅलेड अत्यंत चवदार आणि शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवणारे असून, यामध्ये पालेभाज्या, हंगामी फळे, सुकामेवा आणि विविध बियांचा वापर केला जातो.
-
हे सॅलेड बनवण्यासाठी रॉकेटची पाने (अरगुला किंवा रुकोला म्हणून ओळखली जाणारी एक पौष्टिक पालेभाजी आहे.), भाजलेली ढोबळी मिरची, कलिंगडाचे तुकडे, पांढरा राजगिरा सदृश क्विनोआ, भोपळ्याच्या बिया आणि काजू लागतात.
-
या सॅलेडचे मिश्रण तयार करण्यासाठी ऑलिव्ह तेल, व्हिनेगर, मध, मोहरीची चटणी, मिरचीचा रस आणि चवीनुसार मीठ एकत्र करून घ्यावे लागते.
-
प्रथम एका भांड्यात ऑलिव्ह तेल, व्हिनेगर, मध, मोहरीची चटणी आणि मिरचीचे तुकडे एकत्र करून चवीनुसार मीठ टाकून सॅलेडचे मिश्रण बनवावे.
-
त्यानंतर एका भांड्यात पाणी उकळून त्यात क्विनोआ शिजवून घ्यावा आणि उकळल्यानंतर त्यातील जास्तीचे पाणी काढून टाकावे.
-
शेवटी एका मोठ्या भांड्यात रॉकेटची पाने, शिजवलेला क्विनोआ, भाजलेली ढोबळी मिरची, कलिंगडाचे तुकडे आणि तयार केलेले मिश्रण एकत्र करून त्यावर भोपळ्याच्या बिया व काजू टाकून खाण्यासाठी वाढावे.
Vaibhav Suryavanshi: १५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीला मिळालेल्या ५५ लाख आणि SUV कारवर सरकार किती टॅक्स वसूल करणार? पुण्यातील सीएने सांगितले गणित!