-
ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन होते; ज्याचा शुभ किंवा अशुभ प्रभाव १२ राशींपैकी काही राशीच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. ज्योतिषशास्त्रात गुरू ग्रहाला ज्ञान, सौभाग्य आणि सुख-समृद्धीचा कारक ग्रह मानले जाते.
-
गुरु सध्या मिथुन राशीत विराजमान असून तो २ जूनपर्यंत याच राशी राहणार आहे. -
देवगुरू ०२ जून २०२६ रोजी मिथुन राशीतून त्याची उच्च राशी असलेल्या कर्क राशीत प्रवेश करणार आहे.
-
पंचांगानुसार, देवगुरू ०२ जून २०२६ रोजी मध्यरात्री ०२ वाजून २५ मिनिटांनी कर्क राशीत प्रवेश करणार आहे. या राशीमध्ये देवगुरू ३१ ऑक्टोबर पर्यंत राहील.
-
कर्क ही चंद्राचे स्वामीत्व असलेली रास असून गुरू ग्रहाच्या राशीतील प्रवेशाने हंस महापुरुष राजयोग निर्माण होईल, हा योग तब्बल पाच महिने जागृत असेल.
-
पुढील पाच महिने मेष राशीच्या व्यक्तींना आयुष्यात अनेक चांगले बदल पाहायला मिळतील. या काळात तुमची आर्थिक स्थिती मजबूत असेल. स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळेल. धार्मिक स्थानांना भेट द्याल. अध्यात्माविषयी मनात ओढ राहील.
-
पुढील पाच महिने मकर राशीच्या व्यक्तींसाठी गुरूचे राशी परिवर्तन खूप लाभदायी सिद्ध होईल. या काळात तुम्हाला आकस्मिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. वैवाहिक आयुष्यातील तणाव दूर होईल. कर्ज कमी होण्यास मदत होईल. दूरचे प्रवास घडतील.
-
पुढील पाच महिने वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी लाभदायी असतील. या काळात कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. अचानक धनलाभ होतील, आयुष्यात अनेक मोठे बदल पाहायला मिळतील.
-
(टीप : वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
-
(फोटो सौजन्य: AI)
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृह शहरात कारवाई… शेकडो किलो प्रतिबंधात्मक तंबाखू जप्त…