-
आज ३ जून रोजी ‘राष्ट्रीय अंडी दिन’ (National Egg Day) साजरा केला जातो.
-
अंडी हा संपूर्ण प्रथिनांचा (complete protein) एक समृद्ध स्रोत असून ते स्नायूंची वाढ, दुरुस्ती आणि शरीराच्या एकूण ताकदीसाठी मदत करतात.
-
अंड्यांमध्ये भरपूर प्रमाणात कोलीन (Choline) असते, जे मेंदूची कार्यक्षमता, स्मरणशक्ती आणि बौद्धिक आरोग्य सुधारण्यास मदत करते.
-
अंड्यांमधून व्हिटॅमिन डी (Vitamin D) आणि कॅल्शियम (Calcium) मिळते, ज्यामुळे हाडे बळकट होतात आणि दात निरोगी राहण्यास मदत होते.
-
अंड्यांमधील उच्च प्रथिनांमुळे (Protein) दीर्घकाळ पोट भरल्यासारखे वाटते, ज्यामुळे अवेळी खाण्याची इच्छा (Cravings) कमी होते आणि वजनाचे योग्य व्यवस्थापन करण्यास मदत होते.
-
अंड्यांमधील अमिनो ॲसिड आणि व्हिटॅमिन्समुळे मूड सुधारतो, ऊर्जा वाढते आणि आरोग्य उत्तम राहते.
-
अंडी खाल्ल्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते, ज्यामुळे मधुमेहींना फायदा होतो.
-
अंड्यांमधील व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि अँटीऑक्सिडंट्समुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि आरोग्य उत्तम राहते.
-
(टीप : येथे देण्यात आलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक महितीकरिता तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.) (सर्व फोटो सौजन्य : फ्रीपिक)
प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम! मान्सूनच्या प्रगतीस पोषक वातावरण