-
गेल्या काही दिवसांपासून अभिनेता रितेश देशमुख ‘राजा शिवाजी’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र होता. त्यामुळे आता चित्रपटाला चांगलं यश मिळाल्यावर रितेश आपल्या कुटुंबीयांसह फॅमिली ट्रिपला गेला आहे.
-
रितेश व जिनिलीया आपल्या दोन्ही मुलांसह मालदीवला गेले आहेत.
-
या ट्रिपचं आणखी एक खास कारण होतं ते म्हणजे त्याच्या लाडक्या लेकाचा दहावा वाढदिवस. रितेशला रियान अन् राहील अशी दोन मुलं आहेत. यापैकी धाकट्या राहीलचा १ जूनला दहावा वाढदिवस होता.
-
निळाशार समुद्र, वॉटर व्हिला अशा निसर्गरम्य वातावरणात राहीलने त्याचा वाढदिवस साजरा केला. याचे खास फोटो अभिनेत्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
रितेश-जिनिलीया त्यांच्या दोन्ही मुलांसह अन् जवळच्या मित्रमंडळींबरोबर मालदीव ट्रिपला गेले आहेत. हा त्यांच्या ट्रिपचा ग्रुप फोटो आहे.
-
दुसऱ्या एका फोटोमध्ये रियान-राहील मालदीवच्या निळाशार समुद्रात स्विमिंग करून धमाल करत असल्याचं पाहायला मिळत आहे.
-
जिनिलीयाने या फोटोंना खास कॅप्शन दिलं आहे. “फॅमिली, मित्र… यांच्याबरोबर घालवलेला चांगला वेळ आणि सोबतीला सुंदर-अथांग समुद्रकिनारा…याला म्हणतात परफेक्ट ट्रिप!” असं कॅप्शन जिनिलीयाने तिने शेअर केलेल्या फोटोंना दिलं आहे.
-
जिनिलीयाने शेअर केलेल्या फोटोंवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. “परफेक्ट फॅमिली”, “दादा वहिनी लय भारी” अशा असंख्य कमेंट्स चाहत्यांनी पोस्टवर केल्या आहेत.
-
दरम्यान, ‘राजा शिवाजी’ सिनेमाच्या माध्यमातून रितेश-जिनिलीयाच्या दोन्ही मुलांनी इंडस्ट्रीत बालकलाकार म्हणून पदार्पण केलं. रियान-राहील यांनी साकारलेल्या बाळ शिवरायांच्या भूमिकेचं सर्वत्र कौतुक करण्यात आलं. ( सर्व फोटो सौजन्य : जिनिलीया देशमुख इन्स्टाग्राम)
सोनम वांगचुक यांची पोस्ट चर्चेत; “मी उपोषण सोडायला तयार पण माझ्या या तीन अटी मान्य कराव्यात”