-
टेलिव्हिजन विश्वाची लोकप्रिय अभिनेत्री श्वेता तिवारी (Shweta tiwari) नेहमीच आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करते.
-
श्वेता तिवारी सध्या तिचा लाडका मुलगा रेयांशसोबत जपानमध्ये सुट्ट्या एन्जॉय करत आहे.
-
श्वेताने सोशल मीडियावर या आनंदी आणि सुंदर ट्रिपचे अनेक फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
-
एका फोटोत श्वेता आणि रेयांश डोळ्यांवर थ्री-डी चष्मे लावून एका रंजक राईडचा आनंद घेताना दिसत आहेत.
-
दुसऱ्या फोटोत दोघेही निळ्या रंगाच्या डिझाईन असलेल्या एका ट्रेनमध्ये बसून गोड हसताना दिसत आहेत.
-
या संपूर्ण प्रवासात श्वेताने तपकिरी रंगाचा टी-शर्ट, निळी जीन्स आणि ट्रेंडी चष्मा घालून एक कुल लूक कॅरी केला आहे.
-
रात्रीच्या वेळी जपानच्या गजबजलेल्या रस्त्यावर श्वेता आणि रेयांशने दोन्ही हात वर करून उत्साहात सेल्फी काढला आहे.
-
हे फोटो शेअर करत तिने ‘Tired feet, happy hearts, and a camera roll full of memories.’ अशी कॅप्शन दिली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: श्वेता तिवारी/इन्स्टाग्राम)
Robert Kiyosaki: “आता पैशाच्या इतिहासातील सर्वात कठीण काळ सुरू होतोय!”; ‘रिच डॅड पुअर डॅड’च्या रॉबर्ट कियोसाकींचे भाकीत