-
Ashok Saraf and Nivedita Saraf age gap : मराठी मनोरंजन विश्वातील एव्हरग्रीन कपल अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांची लव्ह स्टोरी खूपच खास आहे.
-
अशोक सराफ यांच्या यशात निवेदिता यांची साथ मोलाची ठरली.
-
‘नवरी मिळे नवऱ्याला’ या चित्रपटाच्या सेटवर अशोक व निवेदिता यांची फक्त भेट झाली. या दोघांचा या चित्रपटामध्ये एकत्र एकही सीन नव्हता. त्यामुळे शेवटच्या क्लायमॅक्स सीनचं शूट चालू असताना हे दोघं फक्त एकमेकांना भेटले होते. पण, गंमत अशी की, या चित्रपटात अशोक व निवेदिता यांनी एकमेकांच्या भावा-बहिणीची भूमिका साकारली होती.
-
‘नवरी मिळे नवऱ्याला’ या चित्रपटानंतर अशोक-निवेदिता यांनी ‘तू सौभाग्यवती हो’मध्ये काम केलं. पण, त्या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सुद्धा या दोघांचं एकमेकांशी बोलणं झालं नव्हतं.
-
पुढे त्यांनी ‘धुमधडाका’, ‘मामला पोरींचा’ हे चित्रपट केले.
-
अशोक सराफ यांचा अपघात झाला होता, तेव्हा निवेदिता त्यांना भेटायला गेल्या होत्या. त्यांचे प्रयत्न, मेहनत, कलाकार म्हणून प्रचंड जिद्द हे पाहून निवेदिता त्यांच्या प्रेमात पडल्या आणि अशोक यांच्याशीच लग्न करणार असं ठरवलं.
-
अशोक व निवेदिता यांचं लग्न गोव्यात पार पडलं. दोघांच्या वयात जवळपास १८ वर्षांचं अंतर होतं. अशोक सराफ यांचा ‘दोन्ही घरचा पाहुणा’ हा पहिला चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा निवेदिता या अवघ्या ६ वर्षांच्या होत्या. हे अंतर पाहता अभिनेत्रीच्या घरच्यांनी या लग्नाला विरोध केला.
-
चित्रपट क्षेत्रातील कोणत्याही मुलाशी निवेदिताने लग्न करू नये अशी तिच्या आईची इच्छा होती. पण, निवेदिता खूपच ठाम होत्या. यावेळी निवेदिताला मोठ्या बहिणीने म्हणजेच डॉ. मीनल परांजपे यांनी मदत केली होती. त्यांनी कुटुंबीयांचं मन वळवण्याचा पूर्ण प्रयत्न केला.
-
लग्नाच्या दोन दिवस आधीपर्यंत निवेदिता यांनी त्यांच्या आईला लग्नाबद्दल काहीच माहिती दिली नव्हती. गोव्यात मंगेशीच्या देवळात या दोघांचा विवाहसोहळा पार पडला होता. अशोक सराफ यांच्या आईची या जोडप्याचं मंगेशीच्या देवळात लग्न व्हावं अशी खूप इच्छा होती. या दोघांच्या लग्नाचा साग्रसंगीत सोहळा पार पडला होता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निवेदिता यांचा भाऊ म्हणून सचिन पिळगांवकर यांनी अशोक सराफ यांचा कान पिळला होता.
अशोक सराफ व निवेदिता यांना एक मुलगा आहे.
Robert Kiyosaki: “आता पैशाच्या इतिहासातील सर्वात कठीण काळ सुरू होतोय!”; ‘रिच डॅड पुअर डॅड’च्या रॉबर्ट कियोसाकींचे भाकीत