-
अभिनेत्री श्रिया पिळगांवकर ही मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते सचिन पिळगांवकर आणि सुप्रिया पिळगांवकर यांची मुलगी आहे.
-
श्रियाने अभिनयासोबतच दिग्दर्शन आणि निर्मिती क्षेत्रातही स्वतःची अष्टपैलू ओळख निर्माण केली आहे.
-
सध्या सोशल मीडियावर श्रियाच्या नव्या फोटोंची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे.
-
या फोटोंमध्ये श्रिया एका निसर्गरम्य आणि अवाढव्य खडकासमोर उभी असलेली दिसत आहे. हा अनोखा खडक सौदी अरेबियामधील प्रसिद्ध पर्यटन स्थळ ‘एलिफंट रॉक’ (Elephant Rock) आहे.
-
श्रियाने तिच्या या फोटोंना ‘A long day of shoot that begins with this gorgeous sunrise at Elephant Rock’ अशी कॅप्शन दिली आहे.
-
फोटोंमध्ये श्रियाने परिधान केलेला स्टायलिश ड्रेस आणि तिचा गॉगल लूक चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
-
बॅकग्राउंडचा हत्तीच्या आकाराचा खडक आणि सोनेरी सूर्यकिरणे यामुळे हे फोटो अत्यंत सुंदर दिसत आहेत.
-
श्रियाचा हा ग्लॅमरस अंदाज तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडला असून या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव होत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: श्रिया पिळगांवकर/इन्स्टाग्राम)
Robert Kiyosaki: “आता पैशाच्या इतिहासातील सर्वात कठीण काळ सुरू होतोय!”; ‘रिच डॅड पुअर डॅड’च्या रॉबर्ट कियोसाकींचे भाकीत