-
ज्योतिषशास्त्रात सूर्याला आत्मा आणि पित्याचा कारक ग्रह मानला जातो. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत सूर्य मजबूत असतो, त्या व्यक्तीला आयुष्यात भरपूर यश, सुख, पद-प्रतिष्ठा, मान-सन्मान प्राप्त होतो.
-
इतर ग्रहांप्रमाणेच सूर्यदेखील ठराविक काळानंतर राशी परिवर्तन करतो. सूर्याच्या परिवर्तनामुळे १२ राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात विविध बदल आपल्याला पाहायला मिळतात. -
पंचांगानुसार, १६ जून २०२६ रोजी रात्री १२ वाजून १२ सूर्यदेव मिथुन राशीत प्रवेश करतील. या राशीत आधीपासूनच बुध ग्रह विराजमान आहेत. सूर्याच्या या राशीतील प्रवेशाने मिथुन राशीत ‘बुधादित्य राजयोग’ निर्माण होईल, हा योग १२ पैकी काही राशींच्या लोकांसाठी अतिशय अनुकूल सिद्ध होईल. -
ज्योतिषशास्त्रानुसार बुधादित्य राजयोग तूळ राशीच्या व्यक्तींना विशेष लाभदायी असेल. या राशी परिवर्तनामुळे आकस्मिक धनलाभ होतील. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल.
-
कन्या राशीच्या व्यक्तींसाठी बुधादित्य राजयोग या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा सहज पूर्ण होतील. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नोकरी मिळण्याचे योग आहेत. व्यवसायात चांगला नफा मिळू शकतो.
-
सिंह राशीच्या व्यक्तींसाठीही बुधादित्य राजयोग सकारात्मक सिद्ध होईल. त्यामुळे अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील. आकस्मिक धनलाभ होईल. या काळात आई-वडील आणि तुमच्या गुरूंचा आर्शीवाद तुमच्या पाठीशी असेल.
-
मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी बुधादित्य राजयोग खूप लाभदायी असेल. या काळात तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होईल. जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर तुम्हाला चांगला नफा मिळेल. निर्यात आणि आयात व्यवसाय करणाऱ्यांना चांगला नफा मिळू शकतो.
-
धनु राशीच्या व्यक्तींना बुधादित्य राजयोग अत्यंत शुभ सिद्ध होईल. या काळात तुम्हाला काम आणि व्यवसायात प्रचंड यश मिळेल आणि उत्पन्नात प्रचंड वाढ होईल. तुमचा मान-सन्मान वाढेल. कुटुंबातील व्यक्तींसोबत फिरायला जाल, आर्थिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे.
-
(फोटो सौजन्य: AI)
“आंदोलनात जाण्यापेक्षा मी घरीच राहून अभ्यास केला”, NEET परीक्षेत देशात दुसरा आलेल्या पानशुल बन्सलने CJP आंदोलनावर काय प्रतिक्रिया दिली?