-
बिग बॉस १९ फेम मॉडेलने गुपचूप लग्न उरकलं आहे.
-
टीव्हीवरील प्रसिद्ध शो ‘बिग बॉस १९’ आणि ‘द ५०’ चा भाग राहिलेल्या नेहल चुडासमाचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.
-
या फोटोंमध्ये नेहल चुडासमा नवरीच्या रूपात दिसत आहे.
-
हे फोटो समोर येताच नेहलच्या चाहत्यांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला आहे.
-
सोशल मीडियावर प्रत्येकजण नेहल चुडासमावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहे.
-
नेहल चुडासमा हिने काही तासांपूर्वीच आपले फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये अभिनेत्रीच्या हातावर मेहंदी रंगलेली दिसत आहे. तसेच, नेहल चुडासमा लाल रंगाच्या लेहेंग्यात तयार होताना दिसत आहे.
-
नवरीच्या रूपात नेहल चुडासमा अत्यंत सुंदर दिसत होती. नेहल चुडासमाचे हे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत.
-
आपल्या या फोटोमध्ये नेहल चुडासमा तिच्या जोडीदाराचा हात हातात घेतलेली दिसत आहे. हे फोटो शेअर करताना अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये “Still processing this day,” असं लिहिलंय.
-
नेहल चुडासमा ही एक प्रसिद्ध मॉडेल आहे. तिने ‘मिस युनिव्हर्स इंडिया’मध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं.
-
(सर्व फोटो- नेहल चुडासमा इन्स्टाग्राम)
UPSC क्रॅक केली, IAS झाले, पण दोघांनीही घेतला निरोप; रोमन सैनी आणि दिव्या मित्तल यांचा रंजक प्रवास