-
दरवर्षी ८ जून हा दिवस जगभरात ‘जागतिक ब्रेन ट्यूमर दिन’ म्हणून साजरा केला जातो.
-
या गंभीर आजाराबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे आणि रुग्णांना धीर देणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे.
-
योग्य वेळी निदान झाल्यास या आजारावर यशस्वी उपचार करणे शक्य आहे.
-
मेंदूतील पेशींची जेव्हा अनियंत्रित आणि अनैसर्गिक वाढ होते, तेव्हा तिथे एक गाठ तयार होते; यालाच ब्रेन ट्यूमर (Brain Tumor) म्हणतात.
-
दररोज होणारी आणि सामान्य औषधांनीही कमी न होणारी तीव्र डोकेदुखी हे ब्रेन ट्यूमरचे मुख्य लक्षण असू शकते.
-
कोणत्याही कारणाशिवाय (उदा. अपचन किंवा गॅस नसतानाही) अचानक उलट्या होणे किंवा सतत मळमळणे हे मेंदूतील वाढत्या दाबामुळे असू शकते.
-
डोळ्यांचे आरोग्य चांगले असतानाही अचानक धूसर दिसणे (Blurry Vision), एकाच वस्तूच्या दोन प्रतिमा दिसणे (Double Vision) किंवा दृष्टी कमी होणे हे मेंदूतील गाठीचे संकेत असू शकतात.
-
चालताना अचानक शरीराचा तोल जाणे, पाय लटपटणे किंवा वारंवार चक्कर येणे अशी लक्षणे दिसल्यास त्वरित सतर्क व्हा.
-
येथे देण्यात आलेली माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. लक्षणे आढळल्यास कृपया डॉक्टरांचा सल्ला घ्या. (हेही पाहा : केवळ हाडांसाठीच नाही, तर ‘या’ ५ कारणांसाठी रोज दूध पिणे आहे गरजेचे!)
ज्याच्या हास्यावर जग फिदा झाले; तो अरुणकुमार कुठला? खरी कहाणी जाणून डोळे पाणावतील