-
भारतात मुबलक प्रमाणात सूर्यप्रकाश उपलब्ध असूनही, दुर्दैवाने बहुतांश लोकांमध्ये व्हिटॅमिन ‘डी’ची तीव्र कमतरता (Vitamin D Deficiency) दिसून येते.
-
आजकाल लोक आपला जास्तीत जास्त वेळ घर किंवा ऑफिसच्या बंदिस्त वातावरणात घालवतात. तसेच, सनस्क्रीनचा अतिवापर आणि वाढत्या प्रदूषणामुळे त्वचेपर्यंत पुरेसा सूर्यप्रकाश पोहोचतच नाही.
-
व्हिटॅमिन ‘डी’ नैसर्गिकरित्या खूप कमी अन्नपदार्थांमध्ये आढळते. विशेषतः शाकाहारी आहारात याचे प्रमाण नगण्य असते.
-
आहारात मासे, अंडी आणि दुग्धजन्य (डेअरी) पदार्थांचा समावेश कमी असल्यास शरीरात व्हिटॅमिन ‘डी’ची कमतरता निर्माण होते.
-
भारतीय लोकांच्या त्वचेत ‘मेलानिन’ (Melanin) चे प्रमाण जास्त असते. हे मेलानिन सूर्यप्रकाशापासून व्हिटॅमिन ‘डी’ तयार करण्याची शरीराची प्रक्रिया मंदावते.
-
शरीरात चरबीचे प्रमाण जास्त असल्यास व्हिटॅमिन ‘डी’ चरबीच्या पेशींमध्ये अडकून राहते आणि रक्तात व्यवस्थित मिसळू शकत नाही.
-
वाढत्या वयासोबत त्वचेची सूर्यप्रकाशापासून व्हिटॅमिन ‘डी’ तयार करण्याची नैसर्गिक क्षमता कमी होत जाते.
-
आहारातून किंवा उन्हातून मिळालेल्या व्हिटॅमिन ‘डी’चे शरीराला वापरता येईल अशा ‘सक्रिय स्वरूपात’ रूपांतर करण्याचे महत्त्वाचे काम लिव्हर आणि किडनी करतात.
“मी सर्व समर्थकांची माफी मागतो”, मोर्चाच्या दुसऱ्या दिवशी अभिजीत दिपकेंचं विधान चर्चेत; जखमी आंदोलकांना केलं महत्त्वाचं आवाहन