-
प्रिया बापट व उमेश कामत त्यांच्या ‘जर तरची गोष्ट’ या नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला येतात. याबरोबरच ते सोशल मीडियावरही सक्रिय असतात.
-
नुकतेच ते कुटुंबाबरोबर काश्मिरला गेले होते. प्रियाची बहीण, तिचा पती, मुलगी व तिचे वडील या फोटोंमध्ये दिसत आहेत.
-
विविध ठिकाणचे सुंदर फोटो तिने शेअर केले आहेत.
-
तसेच, तिने काही पदार्थांचेदेखील फोटो शेअर केले आहेत.
-
हे फोटो शेअर करताना तिने लिहिले, “शरिवा आणि बाबांबरोबर दरवर्षी अशी सुट्टी घालवण्याची परंपरा आम्ही सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही सगळ्यांनी एकत्र वेळ घालवला. नवीन ठिकाणांचा शोध घेतला, नवीन शहरात फिरलो आणि आयुष्यभर जपून ठेवाव्यात अशा आठवणी निर्माण केल्या”.
-
“बाबा आणि शरिवा ज्या उत्साहाने, आनंदाने या नवीन गोष्टी अनुभवतात, ते पाहणे सर्वात सुंदर आहे. दोन पिढ्यांमधील अंतर असूनही त्यांना असे क्षण एकत्र जगताना पाहून मन भरून येते.”
-
“आईही आमच्याबरोबर असती तर किती छान झाले असते, असे वाटते. जगभर फिरणे आणि नवनवीन ठिकाणे पाहणे हे तिचे न स्वप्न होते. ती आमच्यात नसली तरी तिचा आशीर्वाद आमच्याबरोबर आहे, ती आम्हाला योग्य दिशा दाखवत आहे, बाबांची काळजी घेत आहे. “
-
“ती आज प्रत्यक्ष आमच्याबरोबर नसली, तरी आमच्या प्रत्येक प्रवासात, आनंदात आणि आम्ही एकत्र निर्माण केलेल्या प्रत्येक सुंदर आठवणीत तिचे अस्तित्व कायम आहे.”
-
अभिनेत्रीने शेअर केलेल्या या फोटोवर नेटकरी कमेंट करत प्रेम व्यक्त करत असल्याचे पाहायला मिळत आहे. (सर्व फोटो सौजन्य: प्रिया बापट इन्स्टाग्राम)
“आंदोलनात जाण्यापेक्षा मी घरीच राहून अभ्यास केला”, NEET परीक्षेत देशात दुसरा आलेल्या पानशुल बन्सलने CJP आंदोलनावर काय प्रतिक्रिया दिली?