-
लोकप्रिय मराठी अभिनेत्री प्रार्थना बेहेरे (Prarthana Behere) लवकरच ‘मर्दिनी’ (Mardini Movie) या बहुप्रतीक्षित चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
-
अभिनेता श्रेयस तळपदे प्रस्तुत हा चित्रपट नारीशक्ती, संघर्ष, आत्मसन्मान आणि आईच्या अथांग सामर्थ्याची शौर्यगाथा मांडणारा आहे.
-
सध्या प्रार्थना या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये कमालीची व्यग्र आहे.
-
नुकत्याच झालेल्या एका प्रमोशन इव्हेंट दरम्यान प्रार्थनाचा एक अत्यंत मनमोहक लूक पाहायला मिळाला.
-
यावेळी प्रार्थनाने नेसलेली केशरी रंगाची सुंदर सिल्क साडी तिचे सौंदर्य खुलवत होते.
-
या पारंपारिक लूकवर प्रार्थनाने अगदी हलका मेकअप आणि सिंपल हेअरस्टाईल करण्याला पसंती दिली होती.
-
दरम्यान, स्त्रीशक्तीचा जागर करणारा हा ‘मर्दिनी’ चित्रपट येत्या ३ जुलै रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : प्रार्थना बेहेरे/इन्स्टाग्राम)
आवडती अभिनेत्री कोण? प्रश्न विचारताच तुकाराम मुंढे हसले आणि म्हणाले; “मी..”