-
मराठी चित्रपटसृष्टीतील ग्लॅमरस अभिनेत्री पूजा सावंतचा (Pooja Sawant) आगामी ‘कप बशी’ (Cup Bashi Movie) हा चित्रपट येत्या १९ जून २०२६ रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
-
सध्या पूजा या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये कमालीची व्यग्र असून, तिने नुकतेच सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर केले आहेत.
-
वैभव चिंचाळकर दिग्दर्शित या चित्रपटात पूजासोबतच निर्मिती सावंत, ऋषी मनोहर, नयना आपटे, अनंत जोग, राहुल रानडे, आनंद इंगळे, चिन्मय शिंत्रे, पूर्णिमा तळवलकर आणि आनंद काळे अशी दिग्गज कलाकारांची तगडी फौज पाहायला मिळणार आहे.
-
‘सुकल्प चित्र’ या निर्मिती संस्थेने या चित्रपटाची निर्मिती केली असून, कल्पक सदानंद जोशी हे या चित्रपटाचे निर्माते आहेत.
-
या चित्रपटाच्या कथानकाबद्दल सांगायचे तर, सासू-सुनेच्या नात्याची एक वेगळी आणि रंजक बाजू या चित्रपटाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर उलगडणार आहे.
-
पूजा सावंतने शेअर केलेल्या या फोटोंमध्ये तिने पिवळ्या रंगाचा एक सुंदर ड्रेस परिधान केला आहे.
-
हे फोटो शेअर करताना पूजाने ‘Gratitude For Everything’ (सर्व गोष्टींसाठी कृतज्ञता) असे कॅप्शनही दिले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : पूजा सावंत/इन्स्टाग्राम)
अस्वस्थ तरुण संसदेच्या दारात! हजारोंच्या संख्येपुढे सुरक्षादले हतबल; अश्रुधुराचा माराही निष्प्रभ