-
Ishita Dutta Daughter Veda Face Reveal: ‘दृश्यम’ चित्रपटातून घराघरात पोहोचलेली प्रसिद्ध अभिनेत्री इशिता दत्ता आणि अभिनेता वत्सल सेठ यांच्या चाहत्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे.
-
गेल्या वर्षभरापासून ज्या क्षणाची चाहते उत्सुकतेने वाट पाहत होते, तो क्षण अखेर आला आहे.
-
इशिता आणि वत्सलने त्यांच्या मुलीच्या, म्हणजेच ‘वेदा’च्या पहिल्या वाढदिवसानिमित्त तिचा चेहरा अधिकृतपणे सोशल मीडियावर दाखवला आहे.
-
आत्तापर्यंत या स्टार कपलने आपल्या लाडक्या लेकीचा चेहरा चाहत्यांपासून लपवून ठेवला होता.
-
मात्र, पहिल्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन करत त्यांनी वेदाचे क्युट फोटो शेअर केले आहेत.
-
वेदाचे हे फोटो इंटरनेटवर प्रचंड व्हायरल झाले असून नेटकरी तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.
-
फोटोमध्ये वेदा खूपच क्यूट दिसतेय.
-
इशिता दत्ता व वत्सल सेठ यांना तीन वर्षांचा मुलगा आहे. त्याचा जन्म १९ जुलै २०२३ रोजी झाला होता.
-
गेल्या वर्षी १० जून रोजी त्यांनी लेक वेदाचं स्वागत केलं. (सर्व फोटो- इशिता दत्ता इन्स्टाग्राम)
CJP मधून हकालपट्टी झाल्यावर विजेता दहियाची प्रतिक्रिया, “मी यापुढेही बर्गर खाणारच”, व्हायरल व्हिडीओचा वाद काय?